Man Dhaga Dhaga Jodte Nava : छोट्या पडद्यावरील नव्या मालिकांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. ‘मन धागा धागा जोडते नवा’ (Man Dhaga Dhaga Jodte Nava) ही नवी मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही नवी मालिका आजपासून  (8 मे) ,  सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6.30 वाजता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या मालिकेतील भूमिकांबाबत सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे. जाणून घेऊयात या मालिकेतील भूमिकांबाबत...


आनंदी



‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतील आनंदी ही मायाळू, सहनशील, भोळू, देवावर श्रद्धा असणारी, जबाबदारी, कर्तव्याची जाण असणारी मुलगी आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’या मालिकेत आनंदीच्या आयुष्यात काय काय घडतं? हे बघायला मिळणार आहे. 






देवेंद्र सराफ



देवेंद्र सराफ हे आनंदीचे वडील आहेत. देवेंद्र सराफ यांना स्वयंपाकाची आवड आहे. देवेंद्र हे आपल्या कुटुंबावर प्रेम करतात. ते सरळ मार्गी चालत असतात. 






मालती सराफ



मालती सराफ या आनंदीच्या आई आहेत. त्या काटकसरी आहे. त्यांना संस्कृती जपायला आवडतं. 






सार्थक 



सार्थक हा आपलं काम हेच सर्वस्व मानतो. तो स्पष्टवक्ता, कष्टाळू, वक्तशीर आणि नियमाने वागणारा आहे. 






त्याच बरोबर मनोज, लीना, सुधा, वृंदा, आकांक्षा, अरविंद, शलाका, आदर्श आणि केदार या भूमिका देखील तुम्हाला ‘मन धागा धागा जोडते नवा’ या नव्या मालिकेत बघायला मिळणार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परीची हिंदी मालिकेत एन्ट्री; झळकणार 'बिग बॉस'फेम अभिनेत्रीसोबत