Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आजोबांच्या तब्येतीमुळे नेहा पॅलेसवर राहत असते. अशातच बंडू काकांची तब्येत खालावल्याने यश बंडू काकांना घेऊन प्लॅसवर राहायला जातो. दरम्यान प्लॅसवर सिम्मी काकू बंडू काकांविरोधात नवा प्लॅन बनवते. 


मालिकेच्या आगामी भागात सिम्मी काकू प्लॅसवर किटी पार्टीचे आजोजन करताना दिसणार आहे. दरम्यान त्या मैत्रिणी बंडू काकांच्या चेहऱ्यावर गोष्टी लिहित असून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करतात. यामुळे नेहाला प्रचंड राग येतो आणि ती बंडू काका-काकींना घेऊन प्लॅसवरुन निघून जाते.





दरम्यान परीचे सत्य आजोबांना समजल्यानंतर आजोबा नेहाचा सून म्हणून स्वीकार करतील का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.


संबंधित बातम्या


Shreyas Talpade : सिता आणि द्रौपदीच्या रोलमुळे आत्मविश्वास वाढला, अभिनेता श्रेयस तळपदेने उलगडला प्रवास


Jacqueline Fernandez वर ईडीची मोठी कारवाई, 7 कोटींची संपत्ती जप्त, काय आहे संपूर्ण प्रकरण?


Aai Kuthe Kay Karte : आणखी एक जोडी तुटणार! यशला सोडून गौरी अमेरिकेला जाणार?