Prithvik Pratap and Prajakta Waikul Temple Visit : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप लग्नबंधनात अडकल्यापासून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. पृथ्वीकने गुपचूप लग्न उरकलं. कोणताही गाजावाजा न करता पृथ्वीकने गर्लफ्रेंड प्राजक्त वायकुळसोबत लग्नगाठ बांधली. 25 ऑक्टोबर रोजी पृथ्वीक प्रताप आणि प्राजक्ता वायकुळचा अत्यंत साध्या पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली. आता नवजोडपं देवदर्शनाला निघालं आहे.


लग्नानंतर नवं जोडपं निघालं देवदर्शनाला


अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि प्राजक्ता वायकुळ हे नवं जोडपं आता देवदर्शनाला निघालं आहे. पृथ्वीक आणि प्राजक्ता जोडीनं कोल्हापुरच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनाला पोहोचले होते. महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या दर्शनानंतरचा पृथ्वीक आणि प्राजक्ताला फोटो समोर आला आहे. विनायक खडके नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये नवी जोडपं ट्रेडिशनल अंदाजात फार गोड दिसत आहे.


नव्या जोडप्यानं घेतलं महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन






 


पृथ्वीक प्रताप अन् प्राजक्ता अंबाबाईच्या दर्शनाला


पृथ्वीक प्रताप आणि प्राजक्ता वायकुळ हे नवं जोडपं लग्नानंतर आता देवदर्शनाला पोहोचले. यावेळी पृथ्वीक लाईट पिंक कलरच्या कुर्त्यामध्ये दिसला. तर, त्याची पत्नी प्राजक्ता ग्रीन रंगाच्या कॉम्बिनेशन साडीमध्ये दिसली. हातात ओटी आणि भाळी टिळा असा नवी नवरी प्राजक्ताचा गोड लूक पाहायला मिळत आहे.




महत्त्वाच्या इतर बातम्या :


'गुलिगत किंग'च्या नव्या घरातील गृहप्रवेशाचा मुहूर्त ठरला, 'या' दिवशी सूरज चव्हाण हक्काच्या घरात प्रवेश करणार; अजित पवारांचा भरसभेत शब्द