Kedar Shinde on Bigg Boss Marathi Season 6 :   बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) संपून आठवडा उलटला असला तरीही या सीझनची अजूनही बरीच चर्चा सुरु आहे. तब्बल दोन वर्षांनी बिग बॉस मराठीचा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रितेश देशमुखच्या (Ritiesh Deshmukh) होस्टिंगमुळे सुरुवातीलाच प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज मिळालं होतं. त्यातच सूरज चव्हाण (Suraj Chavan) हा यंदाच्या सीझनचा विजेता ठरला आहे. पण चर्चेत असलेला हा सीझन वाहिनीकडून 70 दिवसांतच संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही नाराजी पाहायला मिळाली. या सगळ्यावर कलर्सचे चॅनल हेड केदार शिंदे (Kedar Shinde) यांची प्रतिक्रिया समोर आलीये.


बिग बॉसचा पाचवा सीझन 70 दिवसांतच आटोपला मग आता बिग बॉसचा सहावा सीझनही 70 दिवसांचाच असणार का? असा प्रश्न बिग बॉस प्रेमींना पडला आहे. या सगळ्यावर केदार शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. केदार शिंदे यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.


केदार शिंदे यांनी काय म्हटलं?


केदार शिंदे यांना बिग बॉसचा हा सीझन 70 दिवसांतच का संपवण्यात आला आणि पुढचा बिग बॉस आल्यावर तेच नियम लागून होणार का? की तो 100 दिवसांचा असणार? असा प्रश्न विचारण्यात आला.  या प्रश्नाचं उत्तर देताना केदार शिंदे यांनी म्हटलं की, मी आता कॉर्पोरेटमध्ये काम करतो, तेव्हा काही गोष्टी या मॅनेजमेंटच्या असतात. जेव्हा मॅनेजमेंट आम्हाला या गोष्टी समजावून सांगते, त्याचे परिणाम दुष्परिणाम जे पूर्ण नेटवर्कसाठी असतात, त्यावेळचा विचार करता हा सीझन 70 दिवसांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  


दरम्यान 70 दिवसांचा खेळ हा याच सीझनसाठी असल्याचं केदार शिंदेंच्या या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीचा पुढचा सीझन हा 100 दिवसांचाच असणार हे आता निश्चित झालं आहे. त्यामुळे आता सहाव्या सीझनची घोषणा कधी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 


ही बातमी वाचा : 


Marathi Serial : 'उदे गं अंबे :कथा साडे तीन शक्तिपीठांची' टीमने देवीला घातलं साकडं, मालिकेच्या सेटवर गोंधळाचं आयोजन