Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar Paddy Kamble :  'बिग बॉस मराठी'च्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) स्पर्धकांमध्ये वाद होत असतात. अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने (Jahnavi Killekar) थेट पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे (Paddy Kamble) यांच्या अभिनयाबाबत आणि करिअरच्या मुद्यावर अपमानास्पद वक्तव्य केले. या वक्तव्याने नेटकऱ्यांनी जान्हवीवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर जान्हवीने बुधवारच्या एपिसोडमध्ये ढसाढसा रडत पॅडी कांबळेंची माफी मागितली. मात्र, नेटकऱ्यांनी जान्हवीने मागितलेली माफी सगळ नाटक असल्याचे म्हटले. काही युजर्सने थेट बिग बॉसवरही आरोप केले आहेत. 


जान्हवी किल्लेकरने ‘बिग बॉस’च्या घरात ‘सत्याचा पंचनामा’ टास्क संपल्यावर पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे यांच्या करिअरला घेऊन वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं होते. टास्कदरम्यान सुरुवातीला निक्कीने त्याला ‘जोकर’ म्हटले होते. तर,  त्यानंतर जान्हवीने पॅडी कांबळेंच्या अभिनय क्षेत्रातील कारर्किदीवरून अपमान केला. जान्हवीच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी जान्हवीच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. तर, काही प्रेक्षकांनी जान्हवीला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याची मागणी केली.


जान्हवी ढसाढसा रडली...काय झालं नेमकं?


बुधवारी, टास्कमध्ये कोणत्याही ग्रुपने बीबी करन्सी न कमावल्याने बिग बॉस घरातील वस्तूंसाठी करन्सी किंवा कॅप्टन्सी हा पर्याय अरबाजला देतात. त्यावेळी अरबाज घरातील सदस्यांचा विचार करतो आणि कॅप्टन्सी सोडतो. अरबाज पटेल हा आपली कॅप्टन्सी निक्कीला देतो. त्यानंतर जान्हवी एकटीच सोफ्यावर बसलेली असते. तिच्या डोळ्यात पाणी पाहून धनंजय तिच्याकडे जातो आणि जान्हवीला पाहून तुला काय झालं विचारतो? यावर जान्हवी, “मी गेम खेळताना अती बोलते दादा” असं म्हणते आणि रडू लागते. त्यानंतर धनंजय तिला सांगतो की, “आता कालचा दिवस गेला… आता नवीन दिवस उगवला आहे. आता हा खेळ आहे आणि आपण प्रतिस्पर्धी आहोत. तू भांडतेस ही चूक नाही पण, शब्द चुकतात. करिअरवरून बोलणं चुकीचं आहे.” अशा शब्दात  धनंजय तिची समजूत काढतो. 


त्यानंतर जान्हवी ही गार्डन एरियामध्ये पॅडीसमोर रडत हात जोडून माफी मागते. त्यावर पॅडी तिची समजूत काढतात. त्यावर पॅडी म्हणतात की, “मी देवाकडे प्रार्थना केली होती की, देवाने तुला खूप मोठी अभिनेत्री बनवावं आणि तुला एवढा स्टॅण्ड घेता यावा की, या माणसाबरोबर मी काम करणार नाही. मी हे करू शकतो. मी विचारेन कोण-कोण आहे जान्हवी किल्लेकर आहे ना? बॉस मी काम नाही करणार! असं मी ठरवलं होतं पण, मी माणूस आहे, मी बाप आहे, मी भाऊ आहे. तर, झालं गेलं राहुदेत त्यामुळे ठीक आता तू रडू नकोस असे म्हणत एक जो स्तर असतो तो निश्चित पाळूया. एकमेकांचा आदर ठेवून भांडूया” असं पॅडी जान्हवीला सांगतात. 


 नेटकरी म्हणतात, जान्हवीचे रडण्याचे कारण दुसरंच...


जान्हवीने पॅडी कांबळेंची माफी मागितली असली तरी नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले की, फेक आहे सगळं असुरक्षित असल्याचे तिला  वाटत आहे. निक्की कॅप्टन झाली म्हणून तिने हे नाटक केले आहे असे या युजरने म्हटले. तर, एकाने म्हटले की, बिग बॉसनेच हिला माफी मागायला सांगितले आहे. तर आणखी एका महिला प्रेक्षकाने म्हटले की हिला कालच पश्चाताप झाला असता मग आर्या तिला बोलत होती तू चुकीचं बोली तर आर्याला माज दाखवत होती आणि आज अचानक असं नाटक आहेत सगळी फालतु आहे ही सुधारणार नाही असेही सुनावले. आणखी एका महिला प्रेक्षकाने म्हटले की,  रितेश सरांचा भाऊंचा धक्का आला की ह्यांना माफी आठवते, खरं तर ते जान्हवीचं रडणं अरबाज ने कॅप्टन पद न दिलेल्याचं होतं, मग ते माफीवर गेलं एवढंच असे मत नोंदवले. 








जान्हवीच्या नवऱ्याने दिला पाठिंबा...


पॅडीबाबत (Paddy Kamble) लाजिरवाणं भाष्य केल्यानंतर जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) हिच्यावर सोशल मीडियावर टीकेचा भडीमार सुरु आहे. त्यानंतर आत जान्हवीसाठी नवरा मैदानात उतरला आहे. ट्रोलर्सने निशाण्यावर धरल्यानंतर जान्हवीच्या पतीची प्रतिक्रिया समोर आली आहे. बिग बॉस मराठी घरातील घडामोडींवर जान्हवी किल्लेकरच्या पतीने अधिकृत निवेदन जारी केले. जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते एखाद्याच्या करियर बद्दल बोलण योग्य नाही पण जेव्हा हे घडल तेव्हा चे क्षण तसे असल्यामुळे ती रागाच्या प्रवाहात बोलून गेली. याचा अर्थ असा नाही ती बरोबर आहे, ती नक्कीच चुकली आहे. बिग बॉसचे घर साधं घर नाही, तिथे आलेली लोक पॉझिटिव्ह असतील, असं पण नाही आणि प्रत्येक जण निगेटिव्ह आहेत, असंही नाही. तिथे गेल्या नंतर लोक बदलतात, त्यांचे वागण्याची पद्धत बदलते, याच्याशी त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही असे किरण किल्लेकरने म्हटले. जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची बाकीचे सदस्य बोलतात, ते सगळं बरोबर. जेव्हा धनंजय बोलतो वर्षाताईंबद्दल मी ह्या बाईचा एक दिवस पाण उतारा करीन. अंकिता बोलते, हिच्या मध्येच खूप खोडी आहेत, अशी सासू मला नको. तेव्हा पंढरीनाथ बोलतात, कॅमरा आपल्याकडे आहे, नका बोलू, तेव्हा कुठे गेलेले आदर्श तेव्हा वर्षा ताई सिनियर नव्हत्या म्हणजे? असा सवालही किरण किल्लेकरने उपस्थित केला.