एक्स्प्लोर

Indrayani Colours Marathi Serial Track: इंदू खोट्या काका-काकूंचा पर्दाफाश कसा करणार? सानिका-सरकार कसं करणार आव्हानं पार? 'महाशिवरात्री'निमित्त विशेष भाग!

Indrayani Colours Marathi Serial Track: इंद्रायणी खोट्या काका-काकूंचा पर्दाफाश कशी करणार? सरकार सानिकाच्या हाताला यश येणार? 'महाशिवरात्री'निमित्त कलर्स मराठीवर विशेष भाग...

Indrayani Colours Marathi Serial Track: 'इंद्रायणी' मालिकेत महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कथानकात नवं वळण येणार आहे. इंद्रायणीचे काका-काकू खरे नसून ते फसवे असल्याचं समजताच ते इंदूला धमकी देतात की, जर तिनं हे सत्य कोणालाही सांगितलं तर अदूच्या जीवाला धोका होईल. यामुळे इंद्रायणी संभ्रमात पडते आणि या परिस्थितीत इंद्रायणी गपचूप गोपाळ समोर सत्य आणण्याची योजना आखते. महाशिवरात्रीचा दिवस उगवतो. इंदूला काका-काकूंकडून महाशिवरात्रीच्या कीर्तनाची परवानगी मिळते. कीर्तनाच्या वेळी ती 'पुत्रणा मावशीचे कीर्तन' सादर करत असताना गोपाळला काका-काकू खरे नसल्याचे संकेत देते. आता यामुळे इंद्रायणी खोट्या काका-काकूंचा पर्दाफाश कशी करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

लय आवडतेस तू मला मालिकेत सरकार - सानिकाचा कळशी गावातील गावकऱ्यांसोबतच लढा सुरुच आहे. साहेबरावांनी साखर कारखाना बंद केल्यानंतर कळशीगाव बेरोजगारीसाठी सानिका आणि सरकारला जबाबदार धरतं. मात्र, या विरोधातही सानिका हार मानत नाही. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ती एक नवा मार्ग शोधते आणि तो म्हणजे 'चहाचा गूळ' तयार करण्याचा. मात्र, गावकरी तिच्या कल्पनेला अशक्य मानून तिची खिल्ली उडवतात. सानिका आव्हान स्वीकारून स्वतः गूळ बनवून दाखवण्याचा निर्धार करते. 

दरम्यान, सरकारदेखील महादेवाची कृपा मिळवण्यासाठी कठोर व्रत करताना दिसणार आहे. सानिकाच्या अथक प्रयत्नांना यश मिळावे, म्हणून सरकार प्राचीन महादेव मंदिरातील शिवलिंगावर 101 वेळा नदीचे पाणी वाहण्याचा संकल्प करतो. एकीकडे सानिका गावकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि बेरोजगारी मिटवण्याच्या प्रयत्नात आहे तर दुसरीकडे सरकार तिला यश मिळावे यासाठी झुंजतो आहे. एकाला यश पाहिजे, तर दुसऱ्याला देवाचा आशीर्वाद. आता बघूया पुढे मालिकेत काय घडणार? महादेवाच्या आशीर्वादाने सानिका - सरकार कसे हे आव्हानं पार करणार. 

यावर बोलताना तन्मय जक्का म्हणाला, "हा सीन चित्रीत करताना खूप आव्हानात्मक अनुभव होता. रणरणत्या उन्हात आम्ही हा सिन शूट केला... जवळपास 3-4 तास लागले, तीव्र उन्हामुळे चटके तर लागतच होते पण पाय खरंच पोळले होते आणि 101 फेऱ्या पूर्ण केल्यासारखं वाटलं. पण त्यानिमित्तानं महादेवाची सेवा करण्याची संधी मिळाली, हे विशेष वाटतं. दरम्यान, उष्णतेमुळे थोडं कठीण झालं पण टीमनं त्वरित काळजी घेतली. अशा सीनसाठी फिटनेस खूप महत्त्वाचा असतो, कारण शारीरिक आणि मानसिक तग धरावा लागतो,"

दरम्यान, कलर्स मराठीवरील (Colours Marathi) इंद्रायणी (Indrayani) आणि लय आवडतेस तू मला (Lai Avadtes Tu Mala) मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Prajakta Koli Haldi PHOTOs: हळद सजली गं... व्हाईट गरारा, हातात फुलांचे कलीरे; हळदी सेरेमनीसाठी प्राजक्ता कोळीचा युनिक लूक, होणाऱ्या नवऱ्यासोबत धम्माल मस्ती!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी, जोतीरावांची भूमिका साकारणार 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेता
सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी, जोतीरावांची भूमिका साकारणार 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेता
'बायको पाहिजे...' उन्हातान्हात, मुंबईच्या रस्त्यांवर, लोकलमध्ये फिरणारा पोस्टर तरुण कोण? VIDEO व्हायरल
'बायको पाहिजे...' उन्हातान्हात, मुंबईच्या रस्त्यांवर, लोकलमध्ये फिरणारा पोस्टर तरुण कोण? VIDEO व्हायरल
Bigg Boss Marathi Session 6: कॅप्टन्सी टास्कमध्ये दोऱ्यांमध्ये अडकला संकेत; 'त्याच्या गळ्यात दोरी अडकलीय!', राखी ओरडली, बिग बॉसनं थांबवला टास्क
कॅप्टन्सी टास्कमध्ये दोऱ्यांमध्ये अडकला संकेत; 'त्याच्या गळ्यात दोरी अडकलीय!', राखी ओरडली, बिग बॉसनं थांबवला टास्क

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget