Bigg Boss 16 : देशातील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मध्ये फॅमिली वीक सुरु होणार आहे. तर, घरातील सदस्यांना त्यांच्या प्रियजनांना भेटताना पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक झाले आहेत. फॅमिली विकमध्ये स्पर्धकांचे फॅमिली मेंबर्स कोण कोण येणार आहेत हे शोच्या मागील एपिसोडमध्ये दाखविण्यात आले होते. यावेळी एक मोठा सेलिब्रिटीसुद्धा बिग बॉसच्या या सीझनमध्ये सहभागी झाला आणि तो स्पर्धक म्हणजे साजिद खान.
साजिद खान देखील या शोचा एक भाग आहे, त्यामुळे त्याच्या कुटुंबातील सदस्य देखील फॅमिली वीकेंडला बिग बॉसमध्ये दिसणार आहेत का? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. तर, काही काळासाठी बिग बॉस शोची होस्ट असलेली साजिद खानची बहीण फराह खानदेखील तिचा भाऊ साजिद खानला भेटण्यासाठी शोमध्ये प्रवेश करताना दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फराह खान कुटुंबातील सदस्यांबरोबर मस्ती करताना दिसणार आहे.
घरातील स्पर्धकांसाठी फराहकडून स्पेशल डिश
शोच्या दरम्यान फराह खान शिव ठाकरेला सांगताना दिसणार आहे की, अब्दु रोजिक, साजिद खान आणि एमसी स्टेन यांच्यामुळे तिला तीन भाऊ मिळाले आहेत. प्रियांका चौधरीला ती घरची 'दीपिका पदुकोण' देखील म्हणताना दिसणार आहे. तसेच फराह घरातील स्पर्धकांसाठी पुलाव, यख्नी पुलाव आणि अब्दु रोजिकसाठी बर्गर यांसारखे चविष्ट पदार्थ घेऊन येणार आहे.
आता फराह खान घरात आल्यानतंर ती साजिद खानची शाळा घेते की त्याला कोणता सल्ला देते हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :