Bigg Boss 18: बिग बॉस 18 च्या घरात सध्या रोहित शेट्टी आणि एकता कपूर आपला जलवा दाखवत आहेत. घरातल्या स्पर्धकांना त्यांनी सळो की पळो करून सोडल्याचं शुक्रवार आणि शनिवारच्या एपिसोडमध्ये दिसलं. शनिवारचा एपिसोड मध्ये बिग बॉसच्या घरात रोहित शेट्टी यांना सो होस्ट केल्याच दिसलं. यावेळी घरात विव्हियन आणि दिग्विजय यांच्यामध्ये मोठी वादावादी झाल्याचा दिसलं. विवियांच्या बोलण्यावर दिग्विजयही संतापला होता.


रोहित शेट्टीने विवियनला दिग्विजय असला काय नसला काय काय फरक पडतो असं विचारलं. तेव्हा विवियन म्हणाला, सगळा पेपर वाचून आला आहे. पास होईल असं काही दिसत नाही. विवियांच्या या बोलण्यावर दिग्विजय ऑफेंड झाल्याच दिसलं. आपल्यात स्वतः विषयीचा एक कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे माझ्यातही तो खूप आहे. विव्हियन मध्ये एक नकारात्मक सुपेरीओरीटी कॉम्प्लेक्स आहे. 


मी माझ्या बापाशिवाय कोणाला सहन करत नाही


मी माझ्या बापाशिवाय कोणाला सहन करत नाही त्यामुळे  तुला तर सहन करणारच नाही.. असं दिग्विजय ठासून म्हणाला. यावर विवियन ने हा तुझ्या बोलण्याचा दर्जा आहे का असा सवाल त्याला केला. तू अशीच खालचा दर्जाची वक्तव्य करत रहा असेही विवियन त्याला म्हणाला तेव्हा रजत संतापून विविअनला त्याने गप्प बसवलं. 


 






रोहितने करणलाही आरसा दाखवला 


बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचा खेळ बाहेर कसा दिसतोय हे सांगताना रोहित शेट्टीने करणवीरला ही आरसा दाखवल्याच दिसलं. कलर्स टीव्ही नाईन नुकताच त्याचा प्रोमो शेअर केला आहे. यात रोहित शेट्टी करणविरला म्हणतो, आता असं दिसत आहे, घरात जेव्हा एखादा महत्त्वाचा मुद्दा सुरू असतो तेव्हा तू त्यात पडत नाही. जे घडत असेल ते लांबून पाहतोस. जे आता दिसून येत आहे. तू वेगळच नरेटिव्ह सेट करत आहेस.


 






करणवीर वाटतो गोंधळलेला, रोहित शेट्टी म्हणाला..


खतरो के खिलाडी या रियालिटी शोमध्ये विनर ठरलेला करणवीर सध्या फार गोंधळलेला दिसत असल्याचं रोहित शेट्टीने त्याला सांगितलं. या गेम मध्ये ही तुझी स्ट्रॅटर्जी असू शकते. पण त्या नादात तू लॉस्ट दिसत आहेस. जेव्हा कुठलाही मुद्दा सुरू असतो तेव्हा एक तू सगळं पाहत असल्याचं दिसून येतं. रजत आणि अविनाश च्या मारामारी मध्ये यात पडू नका असा सल्ला त्याने दिला होता. पण त्याचा हाच डाव साराच्या वागण्यानंतर दिसला नसल्याचं रोहित म्हणाला.