Elvish Yadav and Prince Narula Fight Video : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो रोडीज सध्या चर्चेत आहे. यंदा रोडीज शोचा 20 वा सीझन सुरु असून त्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळताना दिसत आहे. रोडीज 20 वा सीझन रोडीज XX सुरु झाला आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन स्पर्धकांची ऑडिशन घेतली जात आहे. यंदाच्या सीझनमध्ये प्रिंस नरुला, नेहा धुपिया, रिया चक्रवर्ती आणि एल्विश यादव हे गँग लीडर्स आहे. रणविजय सिंह पुन्हा एकदा रोडीज शो होस्ट करताना दिसत आहे. या शोमध्ये प्रिंस नरुला आणि एल्विश यादव एकमेकांना भिडल्याचं समोर आलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सेटवरच भिडले एल्विश यादव आणि प्रिंस नरुला

रोडीज XX च्या सेटवर एल्विश यादव आणि प्रिंस नरुला यांच्यात जोरदार भांडण झालं. एल्विश आणि प्रिंस आपापसांत भिडले. या शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे. प्रोमो समोर आल्यामुळे चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे. प्रिंस आणि एल्विश यादव यांच्यात अनेकदा बाचाबाची पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता दोघांची जोरदार टक्कर पाहायला मिळाली आहे.

रोडीजचा धडकी भरवणारा प्रोमो समोर

रोडीज 20 सध्या चर्चेत आहे. रणविजय सिंगच्या शोचा धडकी भरवणारा नवा प्रोमो समोर आला आहे, जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. रिया चक्रवर्तीमुळे एल्विश यादव आणि प्रिन्स नरुला यांच्यात मोठी लढाई होणार असल्याने आगामी एपिसोडस पाहणं रंगतदार असणार आहे. या शोचा एक नवीन धक्कादायक प्रोमो समोर आला आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. प्रोमोमध्ये प्रिन्स नरुला आणि एल्विश यादव यांच्यात वाद झाल्याचं दिसत आहे.

नेमकं काय घडलं?

जेव्हा एल्विशने रिया चक्रवर्तीसोबत एका स्पर्धकासाठी टीम बनवण्याचा निर्णय घेतला, ज्याला प्रिन्स त्याच्या टीममध्ये घेण्यासाठी इच्छुक होता, तेव्हा हे सर्व घडलं. पण, सुरुवातीला या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि नंतर जे घडलं ते पाहून सर्वच गँग लीडर्स आणि होस्ट रणविजयही आश्चर्यचकित होतो.

एल्विश यादव आणि प्रिन्स नरुला यांच्यात भांडण 

'एमटीव्ही रोडीज डबल क्रॉस 20' ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नवीन व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. प्रिंस एल्विशला म्हणाला, 'मला भाऊ बोलू नकोस. आधी भाऊ बोलतोस आणि नंतर विरोधात खेळतोस'. प्रिन्सच्या या वक्तव्यानंतरही, एल्विशने त्याचा निर्णय बदलला नाही. रिया चक्रवर्तीसोबत टीम बनवण्याच्या निर्णयावरून त्याची प्रिन्ससोबत बाचाबाची झाली, ज्यामुळे प्रिंस आणखी चिडला. प्रिन्स एल्विशला म्हणाला, 'तो बाहेर असंच करतो. त्याची सिस्टिम फक्त त्या मर्यादेपर्यंतच काम करते'. व्हिडीओच्या शेवटी दोघे जिन्यांवर झटापट करताना दिसत आहेत.

सेटवरील भांडणाचा व्हिडीओ चर्चेत

पाहा व्हिडीओ :

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Samantha Ruth Prabhu : समंथाच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री? कोट्यधीश दिग्दर्शकासोबत जुडलं नाव; व्हायरल फोटो एकदा पाहाच