Daar Ughad Baye Marathi Serial Special Episode : 'दार उघड बये' (Daar Ughad Baye) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेचा विवाह विशेष भाग रंगणार आहे. त्यामुळे येत्या रविवारी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 


'दार उघड बये' या मालिकेचा येत्या रविवारी म्हणजेच 5 फेब्रुवारीला एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे. या अॅक्शन पॅक भागाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे. पुरुषी मक्तेदारीला छेद देऊन घरातील स्त्रियांना सन्मान मिळवून देण्यासाठी मुक्ता झटतेय, त्यासोबतच आपला संसार वाचवण्यासाठी देखील तिचा संघर्ष सुरू आहे. 


'दार उघड बये' या मालिकेत दररोज काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. ही मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी आहे. आता ही मालिका रोमांचक वळणावर आली आहे. मुक्ताला सारंगपर्यंत पोहोचू न देण्यासाठी रावसाहेब वेगवेगळी खेळी खेळत आहेत, यासाठी त्यांनी मुक्ताला एका खोलीत डांबून ठेवलंय तसंच तिच्या घरच्यांना पण भैरू त्रास देत आहे. 






रावसाहेब नगरकरांनी खोटेपणाने मुक्ताला डांबून ठेवलं असलं तरी संबळाच्या मदतीने ती त्या बंदीवासातून सुटली आहे. पण आता लग्नाच्या मुहूर्तापर्यंत आपली मुक्ता नगरकर वाड्यात पोहोचावी आणि तिचं आणि सारंगच लग्न व्हावं यासाठी उपस्थित महिलांनी संबळ वाजवून आणि देवीचा गोंधळ घालून देवी आईला साकडं घातलं.  


महाराष्ट्रातील तमाम महिलांचे आशीर्वाद मुक्ता सोबत आहेतच, त्यामुळे सर्व कठीण प्रसंगांना तोंड देऊन मुक्ता सारंग पर्यंत पोहोचणार हे नक्की. पण सगळे अडथळे पार करून मुक्ता लग्नाला कशी पोहोचेल हे बघण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.


'दार उघड बये' मालिकेचा रंगणार विवाह विशेष भाग!


'दार उघड बये' या मालिकेचा 1 तासाचा विवाह विशेष भाग प्रेक्षकांना 5 फेब्रुवारीला रविवारी संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांना झी मराठीवर पाहायला मिळणार आहे. या विशेष भागाची मालिका प्रेमींना चांगलीच उत्सुकता आहे. आता सगळे अडथळे पार करत मुक्ता लग्नाला कशी पोहोचेल हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना हा विशेष भाग पाहावा लागणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Daar Ughad Baye : मुक्ता देणार का पुरुषी मक्तेदारीला छेद? रावसाहेब दिसणार महिलेच्या वेशात