Chala Hawa Yeu Dya:  'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya)  या शोमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. नुकतीच  महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) या चित्रपटाच्या टीमनं  'चला हवा येऊ द्या'  (Chala Hawa Yeu Dya)  या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी 'चला हवा येऊ द्या'  या कार्यक्रमातील कलाकारांनी एक खास स्किट सादर केलं. या स्किटचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की,  राणी सेनापलीला विचारते, 'रिल्सला किती व्ह्यूज मिळाले सेनापती?' यावर सेनापती म्हणतो, 'एका मिनिटात वन मिलियन', त्यानंतर राजा म्हणतो, मिलियनचं सोडा, इथे आज जेवायला मिळेल का नाही? ते कळत नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ नुसतं, हेच काम, वेड लावलंय या रिल्सनं. त्यानंतर राणी पुन्हा रिल बनवते.  हे स्किट पाहून प्रेक्षक खळखळून हसतात.  या स्किटमधील राणीची भूमिका अभिनेत्री श्रेया बुगडेनं साकारली आहे. तर राजाची भूमिका भाऊ कदमनं साकारली आहे.


पाहा प्रोमो: 






भाऊ कदम,निलेश साबळे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके हे कलाकार 'चला हवा येऊ द्या'  या कार्यक्रमामध्ये विविध स्किट सादर करत असतात. निलेश साबळे हा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या मालिकांची तसेच चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी येत असते. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.


महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचं  दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे.  या चित्रपटात अंकुश चौथरी, सना केदार शिंदे, अमित डोलावत या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट  28 एप्रिल 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच या चित्रपटामधील गाणी देखील हिट ठरत आहेत.   महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचे कथानक लोकशाहीर स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर आधारित आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावरही आता मधुमास बहरणार; 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाची टीम शोमध्ये लावणार हजेरी