Boyz 3 World Television Premiere : 'बॉईज' (Boyz) या सिनेमाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाचंदेखील प्रेक्षकांनी कौतुक केलं. त्यामुळे निर्मात्यांनी या सिनेमाचा तिसरा भागदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेल्या काही दिवसांपूर्वी 'बॉईज 3' (Boyz 3) हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर या सिनेमाचा 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर' (World Television Premiere) होणार आहे. 


'बॉईज 3' या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यश आले. अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकले होते. या सिनेमात धैर्या, ढुंग्या आणि कबीर या त्रिकुटाला किर्तीने दिलेली साथ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 






'बॉईज 3' या बहुचर्चित सिनेमाचा 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर' 22 जानेवारीला होणार आहे. 22 जानेवारीला दुपारी 1. वाजता हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. प्रवाह पिक्चरवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. प्रवाह पिक्चरने या सिनेमातील एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"नव्या गाडीची, नवी स्टोरी, बॉईजसोबत आली नवी छोरी...".


'बॉईज 3' या सिनेमातील डायलॉगपासून गाण्यांपर्यंत सर्वच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. 'बॉईज', 'बॉईज 1', 'बॉईज 2', 'बॉईज 3' या सिनेमांनंतर आता या सीरिजचा चौथा भाग 'बॉईज 4'देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे. 


बॉईज 3


कुठे पाहता येणार? प्रवाह पिक्चर


किती वाजता? 22 जानेवारी दुपारी 1.


संबंधित बातम्या


Boyz 3 : बॉईजचा तिसरा डाव सुपरहिट... बॉक्स ऑफिसवर केली 4.96 कोटींची कमाई