Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) नव्या सिझनमध्ये पहिल्याच दिवशी घरात स्पर्धकांची चांगलीच तारांबळ उडाली. अगदी पहिल्याच दिवशी स्पर्धकांना खाण्यासाठी आणि पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याचवेळी बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये निवड केलेल्यांवर एक महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. याचदरम्यान गुलीगत म्हणजेच सूरज चव्हाणने (Suraj Chavan) एक महत्त्वाचा निर्णय घेतला.
'बिग बॉस'ने घरातील सदस्यांना निर्णय घेण्यात कमी असलेल्या तीन सदस्यांची नावे सांगायला लावली. सदस्यांनी सर्वानुमते सूरज चव्हाण, इरिना रूडाकोवा आणि धनंजय पोवार या तीन सदस्यांची नावे घेतली. पण आजच्या भागात याच तीन सदस्यांना 'बिग बॉस'ने निर्णय घ्यायला लावला असल्याचं पाहायला मिळणार आहे. सूरज चव्हाणला निर्णय घेण्यात जास्त वेळ लागत असल्याने आजच्या भागात तो म्हणतो,"माझं डोकं पिकायला लागलंय".
बिग बॉसकडून घरातल्यांसाठी नवा टास्क
इरिना, सूरज आणि धनंजय यांना 'बिग बॉस' त्यांच्याकडे असलेल्या बीबी करन्सीमधून घरासाठी लागणाऱ्या गोष्टी आणि राशन विकत घ्यायला सांगतात. दरम्यान डीपी म्हणजेच धनंजय पोवार म्हणतो,"आपल्याला चना डाळ आणि मूग डाळ तर घ्यावं लागेल". त्यावर इरिना म्हणते,"सगळचं घ्या... निर्णय घेण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवत आहे". इरिना आणि धनंजयच्या संभाषणावर सूरज म्हणतो,"आता माझं डोकं पिकायला लागलंय". तर धनंजय म्हणतो,"माझं फुटलं". यावर सूरज पुढे म्हणतो,"तुझं फुटलंय माझं तुटेल".
सूरज चव्हाण, इरिना रूडाकोवा आणि धनंजय पोवार घरातील सदस्यांसाठी काय-काय राशन घेणार?, घरातील सदस्यांना लॅव्हिश ब्रेकफास्टची मेजवानी मिळणार का?, डिसिजन टेकर नसलेले सदस्य 'बिग बॉस मराठी'च्या घरात डिसिजन कसा घेणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.