Bigg Boss Marathi Season 5 Bigg Boss Marathi New Season Day 6 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची (Bigg Boss Marathi New Season) दिमाखात सुरुवात झाली आहे. नॉमिनेशनच्या पहिल्या टास्कनंतर आता घरातील सदस्यांमध्ये खटके उडू लागले आहेत. नॉमिनेशनच्या टास्क दरम्यान झालेली डील, नॉमिनेट करण्यावरून दिलेली कारणे अशा वेगवेगळ्या कारणांवरून घरातील काही सदस्यांमध्ये वाद निर्माण झालेला दिसत आहे. बिग बॉसच्या घरात एक ग्रुप तयार होण्याआधी आता त्यात वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. रॅपर आर्या जाधवचे आता अरबाजनंतर थेट  छोट्या पडद्यावरील खलनायिका जान्हवी किल्लेकर ( Jahnavi Killekar) यांच्या खटके उडाले आहेत. 


बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये दररोज नवे सरप्राईज पाहायला मिळत आहेत. बिग बॉसकडून देण्यात येत असलेल्या या धक्क्यामुळे घरातील स्पर्धक पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्य एकमेकांसोबत चांगलेच भिडताना दिसत आहेत. आता आजच्या एपिसोडमध्येही जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या या नव्या प्रोमोमध्ये जान्हवी आणि आर्यात झालेली खडाजंगी दाखवली आहे. 


नवा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी आणि आर्या एकमेकींसोबत नडताना दिसून येत आहे. जान्हवी-आर्यामध्ये धक्काबुक्की झालेलीदेखील पाहायला मिळत आहे. दरम्यान  जान्हवी म्हणते,"नॉमिनेशनदरम्यान आर्या किती फडफड करत होती". त्यावर आर्या म्हणते,"माझ्यामध्ये तुम्ही आता येऊ नका". तर जान्हवी आर्याला म्हणते,"किती दिवस 'बिग बॉस मराठी'च्या घरात राहतेस ना तेच बघते मी". त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायल मिळत आहे. आर्या आणि जान्हवीचा प्रोमोमधील पंगा पाहून 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात काय घडतंय हे बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे.







त्याआधी घरात चौथ्या दिवशी आर्या आणि निक्कीमध्येही जोरदार वाद झाला असल्याचे दिसून आले. आर्याला निक्कीचा चांगलाच राग आलेला दिसून आला. आर्या निक्कीला "तुला घाबरायला पाहिजे",म्हणत धमकी देताना दिसत आहे. तर निक्की तिला "फट्टू" म्हणते. त्यावर निक्की तिला "वेडी" म्हणते. आर्या पुढे म्हणते,"मला शांत करायचं नाही". आर्या आणि निक्कीचा राग अनावर झाला असल्याचे दिसून आले. त्याशिवाय, आर्या आणि अरबाज, निक्कीमध्येही वाद झाला असल्याचे दिसून आले.