Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या घरातून आर्या जाधवला घराबाहेर काढलं आहे. निक्कीवर हात उचलल्यामुळे आर्याला बिग बॉसच्या घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कॅप्टन्सी कार्यामध्ये आर्याने संयम सोडून निक्कीवर हिंसेचा प्रयोग केला. यानंतर बिग बॉसने घरातील नियम मोडल्यामुळे आर्याला घराबाहेर काढलं आहे. यानंतर आता आर्याच्या सोशल मीडिया पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.

Continues below advertisement


बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यावर आर्याची पहिली पोस्ट


बिग बॉस मराठीच्या घरातून आर्या जाधवला बाहेर काढल्यावर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आर्याच्या जाधवच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन ब्रोकन हार्ट इमोजी असलेली एक पोस्ट करण्यात आली आहे. एकीकडे बिग बॉसच्या घरात हिंसा केल्यामुळे आर्यावर टीका होत असून तिला बिग बॉसने घराबाहेर काढलं आहे, तर दुसरीकडे आर्याला नेटकऱ्यांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे.


सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...






आर्या जाधवने बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यावर सोशल मीडियावर पोस्टसह इंस्टा स्टोरीही पोस्ट केली आहे.


आर्या जाधवला नेटकऱ्यांचं समर्थन मिळत आहे. आर्याला घराबाहेर काढण्याचा बिग बॉसचा निर्णय चुकीचा असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi : आर्याचं जरा चुकलंच, कानाखाली नाही, तुडवायला हवं होतं; नेटकऱ्यांचा आर्याला फुल्ल पाठिंबा