Bhagyashree Limaye: अभिनेता भाग्यश्री लिमयेनं (Bhagyashree Limaye) अनेक मालिकांमध्ये काम केलं. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. भाग्यश्री ही गेल्या काही दिवसांपासून भाडीपा या युट्यूब चॅनलच्या कांदे पोहे या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. जाणून घेऊया भाग्यश्रीच्या बालपणाबद्दल...
भाग्यश्री लिमयेचं बालपण सोलापूरमध्ये गेलं. बालपणाबद्दल भाग्यश्रीनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं,'मी इंग्रजी माध्यमामधून शिक्षण घेत होते. पण माझी आई सोलापूरच्या नूमवी शाळेची मुख्यध्यापिका होती. त्यामुळे मी माझी शाळा सुटली की आईच्या शाळेत जाऊन बसायचे. त्या शाळेमुळे संस्कृत आणि मराठी माझं चांगलं झालं. लहानपणी नाटकामध्ये मी काम केलं नव्हतं. शाळेत असताना माझ्या कथ्थकच्या तीन परीक्षा झाल्या होत्या. मला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती.'
'एका चांगल्या ब्रँडच्या जाहिरातीमध्ये मी काम केलं. त्यानंतर मी घाडगे अँड सून मालिकेत मी काम केलं.' असंही भाग्यश्रीनं सांगितलं.
भाग्यश्री लिमयेनं तिच्या मांजरीबाबत सांगितलं, 'मला प्राणी खूप आवडतात. म्हणून मी नॉन व्हेज खात नाही. माझ्याकडे तीन मांजरी आहेत. मी शूटिंगला गेले तरी 12 तास ती एकटी राहतात.'
भाग्यश्रीच्या मालिका
भाग्यश्रीच्या घाडगे अँड सून, बॉस माझी लाडाची या मालिकांमधून भाग्यश्री प्रेक्षकांच्या भेटीस आली. घाडगे अँड सून या मालिकेत भाग्यश्री आणि चिन्मय उदगीरकर यांची जोडी प्रेक्षकांना बघायला मिळाली. या मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला आणि मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
तसेच भाग्यश्रीला भाडीपा या युट्यूब चॅनलच्या कांदे पोहे या व्हिडीओ सीरिजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. भाग्यश्री ही सोशल मीडिया अॅक्टिव्ह आहे. तिला इन्स्टाग्रामवर 417K फॉलोवर्स आहे. भाग्यश्री ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. भाग्यश्रीच्या पोस्टला नेटकऱ्यांनी पसंती मिळते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Bhagyashree Limaye : 'भाडीपा' अभिनेत्री भाग्यश्री लिमयेचा ग्लॅमरस अंदाज; फोटो होतायत व्हायरल