Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळीवर हात उचलल्यामुळे आर्या जाधवला शोमधून बाहेर करण्यात आलं आहे. यावर प्रेक्षकांकडून संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर नेटकरी आर्याला पाठिंबा देताना दिसत आहे. आर्याला घराबाहेर काढण्याचा बिग बॉसचा निर्णय चुकीचा असल्याचं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. एवढंच काय तर आर्याचंय समर्थन करत बिग बस मराठी शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी प्रेक्षकांकडून करण्यात येत आहे.
निक्कीच्या आईच्या वक्तव्यावर आर्याची प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडल्यावर आर्या जाधवनं इंस्टाग्रामवर लाईव्ह येत बिग बॉसच्या घरात घडलेल्या घाटनेवर प्रकाश टाकला. बिग बॉसच्या घरात आर्या आणि निक्कीमध्ये नेमकं काय घडलं हे आर्यानं सांगितलं. आर्यानं सांगितलं की, बाथरुमचा दरवाजा उघडताना निक्कीने मला झापड मारली, मी एक सेकंद स्तब्ध झाले. त्यानंतर तिच्या ॲक्शनवर माझी रिॲक्शन होती. हिंसा करणं माझी चूक होती, पण याचा अर्थ ती बरोबर असा होत नाही, असंही आर्यानं म्हटलंय.
"आजही माझ्या अंगावर व्रण आहेत"
आर्या यावेळी म्हणाली की, "मला त्यांनी जेव्हा म्हटलं की घराबाहेर जा, तेव्हा मी काहीच का बोलले नाही की, प्लीज मला ठेवा. कारण ते आदरासाठी असतं. त्यांनी एक निर्णय दिला होता, आता तो बरोबर की चुकीचा हे मला माहीत नाही. पण, मला तेव्हा म्हणायचं नव्हतं की, मी बरोबर आहे, कारण मी हात उचलणं पण चुकीचंच होतं, पण, त्याचा अर्थ असाही नाही की ती बरोबर आहे. कारण, आतापर्यंत जेव्हा तिने हाच उचलला, तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय कोण हिंसा करतं, तुम्हाला माहित आहे. आजही मला लागलेल्या ठिकाणी, आजही माझ्या अंगावर व्रण आहेत."
निक्कीच्या आईला काय म्हणाली आर्या?
आर्याने निक्कीवर हात उचलल्यावर निक्कीच्या आईने आर्यावर टीका केली होती, यावर प्रतिक्रिया देताना आर्या म्हणाली की, "ज्या तिच्या एवढ्या सगळ्या ॲक्शन होत्या, त्यावर निघालेली माझी ती रिॲक्शन होती. मला त्याआधी ही भाऊ बोलले होते की, निक्कीची ॲक्शन असते आणि आर्या तुमची रिॲक्शन असते. निक्कीची आई म्हणते की, तुमची मुलगी तिकडे मार खायला गेलीय का, नाही काकू. पण, बाकीच्यांच्या मुलीही मार खायला नव्हत्या गेल्या तिकडे. आम्ही तिकडे मार खायला कुणीच नव्हतो गेलो."
महत्त्वाच्या इतर बातम्या :