YouTuber Armaan Malik : बिग बॉस ओटीटी 3 फेम यूट्यूबर अरमान मलिक कायमच चर्चेत असतो. बिग बॉसमध्ये दोन बायकांसह एन्ट्री घेतल्याने तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता. दोन बायकांमुळे अरमान मलिकचा सोशल मीडियावर नेहमीच बोलबाला असतो. आता अरमान मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चर्चेचं कारण आहे. अरमान मलिकचं तिसरं लग्न. यूट्यूबर अरमान मलिकने पहिल्या पत्नीच्या मैत्रिणीसोबत दुसरं लग्न केलं. यानंतर तो बिग बॉसमध्ये दोन बायकांसह पोहोचल्यावर त्याच्यावर खूप टीका झाली, आता त्याच अरमान मलिकने पुन्हा लग्न केल्याची चर्चा आहे.
यूट्यूबर अरमान मलिकनं केलं तिसरं लग्न?
यूट्यूबर अरमान मलिकने आता तिसरं लग्न केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अरमान नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रत्येक माहिती शेअर करत असतो. नेटकऱ्यांचीही यावर करडी नजर असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरमान मलिकने तिसरं लग्न केल्याचं बोललं जात आहे.
पहिल्या पत्नीच्या मैत्रिणीसोबत दुसरं लग्न अन् आता...
बिग बॉस ओटीटी 3 स्पर्धक आणि यूट्यूबर अरमान मलिक याने पहिली पत्नी पायल आणि दुसरी पत्नी कृतिका यांच्या मुलांची आया लक्ष्य हिच्यासोबतच्या तिसरं लग्न केल्याची चर्चा आहे. अरमानने याआधीही दोनदा लग्न केलं आहे, त्यामुळे आता त्याच्या तिसऱ्या लग्नाच्या बातम्यांमुळे सोशल मीडियावर नेटिझन्स विविध गोष्टींबद्दल बोलत आहेत आणि अरमानकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
अरमान आणि लक्ष्य यांच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा
अरमान मलिकच्या मुलांच्या नॅनीचं नाव लक्ष्य आहे आणि ती त्यांच्याच घरी राहते. अरमान आणि लक्ष्य यांच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. अरमानच्या मुलांना सांभाळणाऱ्या लक्ष्यने तिच्या सेठ मेहेंदीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये संदीपच्या नावाचा उल्लेख होता. यूट्यूबर अरमान मलिकचं खरं नाव संदिप आहे त्यामुळे लक्ष्य आणि अरमानने तिसरं लग्न केल्याची नेटकऱ्यांनी चर्चा सुरु केली. यावर नेटिझन्सच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.
अरमानच्या पत्नीने काय म्हटलं?
अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचं नाव पायल मलिक आणि दुसऱ्या पत्नीचं नाव कृतिका मलिक आहे. आता अरमानच्या तिसऱ्या पत्नीचे नाव लक्ष्य असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, अरमान मलिकने तिसऱ्या लग्नाच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. त्याची पत्नी पायलनेही तिच्या नुकत्याच व्लॉगमध्ये यावर प्रतिक्रिया देत या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :