Sharmila Shinde Diwali 2024 : दिवाळी हा हिंद धर्मातील सर्वाम मोठ्या आणि महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. दिवाळीमध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. सर्वजण सजावट, फराळ आणि फटाक्यांमध्ये गुंतलेले पाहायला मिळतात. प्रत्येकाची दिवाळी साजरी करण्याची पद्धत वेगळी असते. काहीजण आकर्षक रोषणाई करत दिवाळी साजरी करतात, तर काहीजण फटाके फोडून दिवाळीचा आनंद घेतात. सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करत धम्माल करतात. आता एका अभिनेत्रीने दिवाळीतील तिच्या बालपणाची आठवण सांगितलं आहे, ज्यावेळी च्या हातातच बॉम्ब फुटला होता.
"...अन् बॉम्ब हातातच फुटला"
दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. यावेळी फटाकेही फोडले जातात. मात्र, यावेळी काही दुर्घटनाही घडल्याचं पाहायला आणि ऐकायला मिळतं. अशीच काहीशी घटना एका अभिनेत्रीसोबत घडली होती. अभिनेत्रीने तिच्यासोबत झालेल्या अपघाताचा किस्सा सांगितला आहे. 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेमधील अभिनेत्री शर्मिला शिंदे हिने दिवाळीतील तिची आठवण सांगितली आहे. अभिनेत्री शर्मिला शिंदे 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेमध्ये दुर्गाची भूमिका साकारत आहे.
अभिनेत्रीने सांगितला किस्सा
अभिनेत्री शर्मिला शिंदेने दिवाळीतील तिच्या बालपणीचा किस्सा सांगितलं आहे. झी मराठीने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये शर्मिला शिंदेने सांगितलं की, दिवाळी हा माझ्याही खूप आवडीचा सण आहे. मला फटाके फोडायला आवडायचे, हा तेव्हाचा किस्सा आहे. मी फटाका हातातच पेटवायचे आणि पेटल्यानंतर फुटत आला की फेकायचे. आताही बहुतेक लोक असं करतात, पण तेव्हा हे नवीन होतं. मी सर्वात जास्त आवाज करणारा एक चौकोनी फटाका घेतला, ज्याला ॲटम बॉम्ब म्हणतात. मी इतकी धाडसी होते की, तो मी हातात पेटवला आणि तो पेटत आल्यावर मी फेकणार इतक्यात मला मित्रानं हाक मारली.
"मी थरथरत कापत होते"
शर्मिलाने सांगितलं की, आईच्या मैत्रिणीच्या मुलाने मला गुड्डी या टोपण नावाने हाक मारली. त्याने हाक मारली तेव्हा मी फटाका फेकण्याच्या तयारीत होते, पण त्याने हाक मारल्यावर मी 'ओ' देण्यासाठी मागे वळले आणि फटाका माझ्या हातातच फुटला. मी तिथेच उभी होते फटाका इतक्या जोरात फुटला की, माझ्या कानात वेगळाच आवाज येत होता. मी थरथर कापत होते. मला आदित्यने धरुन पाण्याच्या टाकीजवळ नेलं. माझ्या तोडांवर पाणी मारुन मला गदागदा हलवलं, मग मी थोडी नॉर्मल झाले. मला आठवत त्यावेळी माझा हात हत्तीसारखा सुजला होता. हा किस्सा विनोदी वाटत असला तरी, माझी सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी ग्रीन दिवाळी साजरी करुया.
महत्त्वाच्या इतर बातम्या :