Abol Preetichi Ajab Kahani Marathi Serial : मालिका विश्वात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे प्रयोग होत आहेत. वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' (Abol Preetichi Ajab Kahani) ही नवी मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


आगळेवेगळे विषय कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. मालिकेतील काही व्यक्तिरेखा कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. आता अबोल प्रीतीची अजब कहाणी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची पहिली झलक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. प्रेक्षकांचा लाडका अजिंक्य राऊत या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव राजवीर आहे. त्याच्याबरोबर गुणी अभिनेत्री जान्हवी तांबट हीसुद्धा या मालिकेतून विशिष्ट व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळते आहे.  तिच्या व्यक्तिरेखेचं नाव मयूरी असून ती या मालिकेत बॉडीगार्डच्या वेशातसुद्धा  पाहता येणार आहे.  


राजवीर आणि मयुरीची प्रेमकहाणी फुलणार


'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेत राजवीर आणि मयुरीची प्रेमकहाणी फुलणार आहे. अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut)  पुन्हा एकदा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याचे याआधीचे काम प्रेक्षकांना विशेष आवडले. त्याच्या नव्या भूमिकेची त्याचे चाहते मनापासून वाट पाहत होते. अजिंक्य पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका नव्या भूमिकेतून दिसणार आहे. मालिकेचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना विशेष आवडतो आहे, कारण मालिकेची नायिका जान्हवी तांबट ही वेगळ्या रूपात दिसते आहे. ती चक्क एका बॉडीगार्डच्या वेशात आपल्याला दिसते आहे, तेही पुरुष बॉडीगार्डच्या वेशात.


दिग्गज कलाकारांची फळी असलेली 'अबोल प्रीतीची अजब कहाणी'


जान्हवीसाठी मयुरी आणि बॉडीगार्ड या दोन व्यक्तिरेखा साकारणं हे तारेवरची कसरत ठरणार आहे. आता हा बॉडीगार्ड कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर येईल, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. या मालिकेतून दिग्गज कलाकारांची फळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजिंक्य राऊत, जान्हवी तांबट, सुनील तावडे आणि दीप्ती केतकर हे कलाकार प्रमुख भूमिकांत या मालिकेतून पाहायला मिळतील.


'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेचे शीर्षक गीत गुरू ठाकूर यांनी लिहले असून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी ते गायले आहे. प्रेक्षकांना ताल धरायला लावणारे हा शीर्षक गीत असून रोमँटिक असलेले हे शीर्षक गीत रसिकांच्या मनात घर करते आहे. अजय मयेकर हे या मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत . 


अबोल प्रीतीची अजब कहाणी
कुठे पाहाल? सोनी मराठी
किती वाजता? 17 जुलैपासून सोम. ते शनि. संध्याकाळी 7.30 वाजता


संबंधित बातम्या


Marathi Actor : शो मस्ट गो ऑन... मालिकेच्या शुटिंगदरम्यान अभिनेत्याची प्रकृती खालावली; सेटवरच उपचार सुरू