Aai Kuthe Kay Karteआई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयामुळे आणि कथानकामुळे ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आई कुठे काय करते मालिकेमध्ये अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) या अरुंधती ही भूमिका साकारतात. नुकतीच मधुराणी यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.


मधुराणी प्रभुलकर यांची पोस्ट


मधुराणी प्रभुलकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या 'ए जिंदगी गले लगा ले' हे गाणं गाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करुन मधुराणी प्रभुलकर यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आई कुठे काय करतेचे लवकरच 1000 भाग पूर्ण होतील. 900 भागपूर्ती च्या निमित्ताने आमचे निर्माते राजन शाही सरांनी होम केला होता. आजच्या काळात पार्टी न करता अशा पद्धतीने आनंद साजरा केला जातो हे महत्त्वाचे. तर त्या दिवशी उत्स्फूर्तपणे मी गायलेलं हे गाणं. अचानक सापडलं.आज तुमच्यासाठी पेश करते.' 


मधुराणी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. तसेच मधुराणी यांच्या चाहत्यांनी या व्हिडीओला कमेंट करुन त्यांच्या गाण्याचं कौतुक केलं आहे.






 मधुराणी या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ त्या शेअर करतात.  इन्स्टाग्रामवर त्यांना 238K  फॉलोवर्स आहेत. इन्स्टाग्रामवरील त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. मधुराणी यांनी अनेक नाटक, मालिकांमध्ये काम केलं आहे. आई कुठे काय करते या  मालिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.


आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुख ही भूमिका अभिनेते  मिलिंद गवळी हे साकारतात. तर  संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते.  टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे. या मालिकेचे लवकरच 1000 भाग पूर्ण होतील, असं म्हटलं जात आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत पुन्हा लगीनघाई! अरुंधती-आशुतोष पाणीपुरी डेटवर