Jay Bhanushali Mahhi Vij Finalised Their Divorce: इंडस्ट्रीतल्या आणखी एक सुखी संसारात मिठाचा खडा? घटस्फोटच्या पेपर्सवर सह्या झाल्या, मुलांची कस्टडीचं ठरल्याच्या चर्चा
Jay Bhanushali Mahhi Vij Finalised Their Divorce: दिग्गज सेलिब्रिटींचे घटस्फोटाच्या बातम्या वरचेवर येतच आहेत. अशातच आता आणखी एका प्रसिद्ध जोडप्याचा संसार मोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Jay Bhanushali Mahhi Vij Finalised Their Divorce: इंडस्ट्री आणि त्यातलं ग्लॅमरस, चमचमतं जग, खरंच तसं आहे का? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडलेला असतो. अशातच गेल्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीतली अनेक नाती तुटल्याचं पाहायला मिळतंय. अनेक दिग्गज सेलिब्रिटींचे घटस्फोटाच्या (Celebrity Divorces) बातम्या वरचेवर येतच आहेत. अशातच आता आणखी एका प्रसिद्ध जोडप्याचा संसार मोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, दोघांपैकी कुणीच अद्याप घटस्फोटाच्या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
टेलिव्हिजनवरचा सुप्रसिद्ध अभिनेता जय भानुशाली (Television Actor Jay Bhanushali) आणि माही विज (Mahhi Vij) यांच्या घटस्फोटाच्या (Divorce) चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघेही आता वेगळे होत असल्याचं बोललं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टेलिव्हिजनवरच्या जोडप्यानं याचवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्या आहेत. दोघेही सध्या वेगळे राहतात. यासोबतच आता, मुलांच्या कस्टडीबाबतही अंतिम निर्णय झाल्याचं बोललं जात आहे.
हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, जय आणि माही यांचा घटस्फोट झाला आहे. त्यांच्या मुलांच्या कस्टडीबाबतही निर्णय झाला आहे. विश्वासाच्या मुद्द्यांवरून माही आणि जय यांच्यात वाद निर्माण झाल्याचं वृत्त आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनीही एकमेकांसोबत फोटो पोस्ट करणं, शेअर करणं थांबवलं आहे.
View this post on Instagram
जय, माही शेवटचे एकत्र कधी दिसलेले?
जय आणि माही यांना त्यांची मुलगी ताराच्या वाढदिवशी शेवटचं एकत्र पाहिलं. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सध्या समोर आले आहेत, ज्यामध्ये दोघेही एकमेकांपासून दूर असल्याचं दिसून आलंय. जुलैमध्ये दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. जेव्हा माहीला लग्नाबद्दल विचारलं गेलं, तेव्हा तिनं उत्तर दिलेलं की, "मी तुम्हाला का सांगू? तुम्ही माझे काका आहात? तुम्ही माझ्या वकिलाची फी भराल का?"
माही विज आणि जय भानुशाली यांना तीन मुलं
जय भानुशाली आणि माही विज यांचं 2010 मध्ये लग्न झालेलं आणि आयव्हीएफच्या अनेक प्रयत्नांनंतर अभिनेत्रीनं त्यांची मुलगी ताराला जन्म दिला. त्यांनी त्यांच्या घरकाम करणाऱ्या महिलेची मुलं, राजवीर आणि खुशी यांनाही दत्तक घेतलंय आणि ते एकत्र राहतात. दरम्यान, घटस्फोटाच्या अफवांवर जोडप्यानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :


















