Actor Krrip Kapur Suri Divorce With Wife Simran: मनोरंजन विश्वात (Entertainment World) गेल्या काही महिन्यांपासून अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. त्याचप्रमाणे कित्येक सेलिब्रिटी कित्येक वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्तही होत आहेत. जणू इंडस्ट्रीत घस्फोट घेण्याचा ट्रेंडच आलाय. आता आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्यानं लग्नाच्या तब्बल 11 वर्षांनी आपल्या पत्नीपासून घटस्फोट (Actor Divorce) घेतला आहे. दोघांना एक गोंडस मुलगी आहे.
'उडने की आशा' (Udne Ki Aasha) फेम अभिनेता क्रिप कपूर सुरी (Actor Krrip Kapur Suri ) आणि त्याची पत्नी सिमरन कपूर सुरी यांचा घटस्फोट झाला आहे. लग्नाच्या तब्बल 11 वर्षांनी विभक्त होत असल्याची दोघांनी घोषणा केली. लाडक्या अभिनेत्याच्या घटस्फोटाची बातमी ऐकून चाहत्यांना पुरता धक्का बसलाय. अभिनेत्याच्या घटस्फोटाच्या चर्चांनी गेल्या वर्षीच्या सुरुवातीपासूनच जोर धरलेला. पण, अभिनेत्यानं वेळोवेळी त्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या.
बॉलिवूड शादीनं दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता क्रिप कपूर सुरीची एक्स वाईफ सिमरन कपूरनं 1 जानेवारी 2026 रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमधून क्रिप कपूर सुरीपासून आपण विभक्त होत असल्याची घोषणा सिमरन कपूरनं केली. त्याचप्रमाणे सिमरनची एक पोस्टही व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिनं तिचा एक्स पती क्रिप कपूर सुरीवर अप्रत्यक्षपणे टीकाही केली आहे. यावरुनच अभिनेत्याच्या संसारात सारं काही आलबेल नव्हतं, याची जाणीव होतेय.
क्रिप कपूर सुरीच्या पत्नीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
अभिनेता क्रिप कपूर सुरीची एक्स वाईफ सिमरन कपूरची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टमझ्ये तिनं अभिनेत्याला टॅग करुन लिहिलंय की, "तुझ्यापासून (एक्स पती) दूर जाणं ही माझी कमजोरी नव्हती. तर स्वतःशी प्रामाणिक राहणं हेच माझं धाडस होतं. मला पुन्हा सुरुवात करण्याचा अधिकार आहे. मला अपराधीपणाच्या भावनेशिवाय हसण्याचा अधिकार आहे. मी आशावादी आहे. 'लव्ह मॅरेज'चा हा चॅप्टर आदरानं संपतोय..."
दरम्यान, अभिनेता क्रिप कपूर सुरी आणि त्याची पत्नी सिमरन कपूर सुरी यांनी 6 डिसेंबर 2014 रोजी आपली लग्नगाठ बांधलेली. लग्नाच्या सहा वर्षांनी दोघांनी आपल्या चिमुकल्या परीचं स्वागत केलं. त्यांना एक गोंडस मुलगी आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच दोघांच्या नात्यात तणाव वाढला आणि अखेर सुखी संसारात मिठाचा खडा पडलाच.