Tejasswi Prakash Buys Apartment In Mumbai: टेलिव्हिजनची चुलबुली अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हिनं मुंबईतील (Mumbai News) वांद्रे (Bandra) इथे एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केलंय. तेजस्वीचं मुंबईतलं हे दुसरं घर असून लक्झरी हाऊस असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तेजस्वीच्या घराती किंमत अंदाजे 7.63 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. 

तेजस्वीनं नवं लक्झरी अपार्टमेंट बे हाइट्समध्ये खरेदी केलं आहे, जो हिरानंदानी डेव्हलपर्सचा अंडर-कंसट्रक्शन प्रोजेक्ट आहे. सीआरई मॅट्रिक्सनं (CRE Matrix) दिलेल्या वृत्तानुसार, हे अपार्टमेंट बे हाइट्सच्या 14 व्या मजल्यावर आहे. त्यात दोन पार्किंग स्पेस आहेत आणि नोव्हेंबर 2030 पर्यंत या अपार्टमेंटचा ताबा मिळण्याची अपेक्षा आहे.

तेजस्वी प्रकाशनं नव्या अपार्टमेंटसाठी किती पैसे मोजले?

तेजस्वी प्रकाशनं 16 फेब्रुवारी 2026 रोजी केलं होतं. यासाठी तिनं 38 लाख स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरून या अपार्टमेंटची नोंदणी केली होती. कागदपत्रांनुसार, तेजस्वी प्रकाशनं डेव्हलपरला 76 लाख रुपयांहून अधिकची 10% बुकिंग रक्कम दिली आणि उर्वरित रक्कम इमारतीला ओसी लेटर मिळेपर्यंत 12 हप्त्यांमध्ये दिली जाईल.

तेजस्वी प्रकाशची कमाई आणि गुंतवणूक, रिअल इस्टेट आणि सलून बिजनेस

तेजस्वी प्रकाश केवळ अभिनयातूनच नव्हे तर ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडिया तसेच रिअल इस्टेटमधूनही पैसे कमवते. तेजस्वीनं एकदा भारती सिंहच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती, त्यावेळी तिनं सांगितलं होतं की, तिनं विविध बिजनेसमध्ये गुंतवणूक केली आहे आणि आता ती घरबसल्या एकदम आरामात त्यातून खूप पैसे कमावते. तेजस्वीनं असंही सांगितलं की, तिचा रिअल इस्टेट व्यवसाय आहे आणि तिनं एक सलूनसुद्धा उघडलं आहे. 

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून पैसे करते दुप्पट 

तेजस्वी म्हणाली की, तेजस्वी तिच्या खर्चाबद्दल खूप कॉन्शस आहे आणि म्हणूनच ती महागड्या वस्तूंवर पैसे वाया घालवत नाही. त्याऐवजी, ती ते पैसे रिअल इस्टेट आणि प्रॉपर्टीत गुंतवते, जिथे ते दुप्पट होतात.

दरम्यान, तेजस्वी प्रकाशच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर, तेजस्वी प्रकाशनं सलून व्यतिरिक्त अनेक रिअल इस्टेट प्रॉपर्टीजमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्याच्या भाड्यातून तिला खूप उत्पन्न  मिळतं. तिची दुबईमध्येही प्रॉपर्टी आहे आणि गोव्यातही तिनं प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. रिपोर्टनुसार, तेजस्वी प्रकाशची एकूण संपत्ती 20 कोटी आहे. तिनं 'लाफ्टर शेफ्स'मधूनही बरीच कमाई केली आहे. रिपोर्टनुसार तिला प्रत्येक एपिसोडसाठी 2-3 लाख रुपये मिळतात. तेजस्वी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.