Marathi actress Tejashri Pradhan: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानचा (Tejashri Pradhan) चाहतावर्ग खूप मोठा  आहे. तिनं अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिकाही साकारली आहे. तेजश्री सध्या झी मराठीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' (Veen Doghatli Tutena) या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेत तिची मुख्य भूमिका आहे. स्वानंदीची व्यक्तीरेखा साकारुन तिनं अनेकांची मने जिंकली आहेत.  या मालिकेत सुबोध भावे याचीही मुख्य भूमिका आहे. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान, तेजश्रीच्या एका पोस्ट  आणि स्टोरीनं प्रेक्षक तसेच तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तेजश्री प्रधान  एका खास जागी फिरायला गेली असल्याचं पाहायला मिळत आहे.

तेजश्री प्रधान पोहोचली निसर्गाच्या खुशीत (Marathi actress Tejashri Pradhan latest travel)

तेजश्री प्रधान आपल्या खास दिवसासाठी उत्तराखंडला पोहोचली आहे.  2 जून रोजी अभिनेत्रीचा वाढदिवस असतो. आपल्या  वाढदिवसाच्या खास निमित्ताने तिनं स्वत:ला ही ट्रिट दिलीये.  तिनं आपल्या ट्रिपचे काही फोटोज चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या बर्थडे वीक निमित्त अभिनेत्री उत्तराखंडसह नैनीतालही फिरणार आहे.   

तेजश्रीने आपल्या ट्रिपचे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री एका कठड्यावर बसलेली पाहायला मिळत आहे.  तिचा मॉडर्न कॅज्युल लूक पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने  बेज रंगाचा शर्ट, ब्लॅक पँट आणि कॅप घातली आहे. तिनं आपल्या फोटोंसह  नैनिताल लेकचा नाइट  व्ह्यूचा फोटोही शेअर केला आहे.   दरम्यान, तिनं आपल्या फोटोंमधून कोणतेही लोकेशन उघड केलेले नाही.

 

तिनं निसर्गाच्या सानिध्यातील फोटो शेअर करुन या पोस्टला खास कॅप्शनही दिलं आहे.  'उद्या मी निसर्गात, पर्वताच्या सानिध्यात असेन,   खबरदारी म्हणून सांगते..   आय लव्ह यू ऑल इन अॅडव्हान्स.. #HappyLife' , असं म्हणत तिनं आपल्या पोस्टवर सुंदर आणि खास कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्रीची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी कमेंट करुन तेजश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रोहिणी पाराध्येनंतर आणखी एका इन्फ्ल्युएंसरनं उचललं टोकाचं पाऊल; राहत्या खोलीतच जीवन संपवलं, कारण...