एक्स्प्लोर

Tejashree Pradhan: घटस्फोटाला 11 वर्ष, सिंगल असलेली तेजश्री प्रधान पुन्हा लग्न करण्यासाठी तयार; आयुष्यात सेटल होण्याबाबत म्हणाली...

लग्न आणि प्रेमाबद्दल तेजश्रीने केलेल्या विधानानंतर चाहते तेजश्रीच्या आयुष्यात कोण येणार याची वाट पाहत आहेत. 

Tejashree Pradhan On Marriage: अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय चेहरा आहे. तेजश्री कायमच तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवते. 'होणार सुन मी या घरची', अगबाई सासूबाई, प्रेमाची गोष्ट आणि आता 'वीण दोघातली तुटेना' या मालिकांमधून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करतेय. सध्या झी मराठीवरील 'वीण दोघांतली तुटेना ' या मालिकेत स्वानंदीची भूमिका साकारत आहे. मालिकांमधील तिच्या भूमिका जेवढा गाजल्या तेवढेच तिचं वैयक्तिक आयुष्य ही चर्चेत असतं. घटस्फोटाच्या 11 वर्षानंतर आता तेजश्री पुन्हा लग्न करण्यासाठी तयार असल्याचं तिने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 'सिने तडका'ला दिलेल्या मुलाखतीत लग्न करून सेटल व्हायला आवडेल का असा प्रश्न विचारल्यावर तिने या प्रश्नाचे उत्तर दिलं. 

दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणाली तेजश्री?

अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या झी मराठीवरील 'वीण दोघातही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकांमध्ये सोज्वळ आणि प्रसंगी खंबीर भूमिका साकारणाऱ्या तेजश्री च्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. अनेकदा ती मुलाखतींमध्ये आपल्या मनातल्या भावना मोकळेपणाने बोलताना दिसते. अभिनेता शशांक केतकर सोबत घटस्फोट झाल्यानंतर आता 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा तेजश्री प्रधान लग्न करायला तयार आहे. सिने तडकाला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल खुलासा केला आहे. 'तुला असं वाटतं का की तू आता प्रेमात पडू शकतेस?' असा प्रश्न तेजश्रीला विचारण्यात आला. त्यावर लगेच तेजश्रीने 'नक्कीच ' असं उत्तर दिलं. तुला सेटल व्हायला आवडेल का असेही तिला विचारल्यानंतर तिने हसत 'का नाही ? नक्कीच.. ' असं उत्तर दिलं. शशांक केतकरसोबत घटस्फोट झाल्यानंतर तेजश्री दुसऱ्या लग्नाबद्दल विचार करत नव्हती.मात्र आता अकरा वर्षानंतर आपण पुन्हा प्रेमात पडायला तयार आहोत असं तिने सांगितलं. लग्न आणि प्रेमाबद्दल तेजश्री ने केलेल्या विधानानंतर चाहते तेजश्रीच्या आयुष्यात कोण येणार याची वाट पाहत आहेत. 

तेजश्रीच्या आयुष्यात कोणी खास व्यक्ती आहे का?, हे तिने स्पष्टपणे सांगितलेलं नाही; पण प्रेमात पडायला आणि लग्न करून सेटल व्हायला ते तयार असल्याचं ती म्हणाली आहे. एकीकडे 'वीण दोघातही तुटेना' या मालिकेत स्वानंदी आणि समरच्या प्रेमाला बहर आला आहे. स्वानंदीची भूमिका साकारणारी तेजश्री प्रधान खऱ्या आयुष्यात सिंगल असली तरी तिने अलीकडेच दिलेल्या विधानामुळे ती चर्चा झाली आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aarti Solanki on Balancing Devi Murti: '...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
'...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
Janhavi Killekar Pune Missing Boy: कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
Drishyam 3 Marathi Actress: अजय देवगणच्या 'दृश्यम 3'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा जलवा; पोलिसाची भूमिका साकारली, शूटिंगचा अनुभव केला शेअर
अजय देवगणच्या 'दृश्यम 3'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा जलवा; पोलिसाची भूमिका साकारली, शूटिंगचा अनुभव केला शेअर
Kiran Rao on Relationship: 'लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणं नॉर्मल'; आमिर खानच्या एक्स बायकोचं बोल्ड वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?
'लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणं नॉर्मल'; आमिर खानच्या एक्स बायकोचं बोल्ड वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाली?
Advertisement

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Girija Oak Photos: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
Embed widget