मी फुलबाजीसारखी झळाळते… तेजश्री प्रधानच्या दिवाळीच्या आठवणींनी नेटकऱ्यांना भुरळ पाडली!
‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेतील स्वानंदी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने दिवाळीच्या निमित्ताने तिच्या बालपणातील आणि आजच्या सण साजरा करण्याच्या खास आठवणी शेअर केल्या आहेत

Tejashree Pradhan:दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद, एकत्र येणं आणि आठवणींनी भरलेला काळ. प्रत्येकासाठी या सणाचं काहीतरी वेगळं महत्त्व असतं आणि आपल्या आवडत्या कलाकारांनाही त्याचं तितकंच भावनिक नातं असतं. झी मराठीवरील ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेतील स्वानंदी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने दिवाळीच्या निमित्ताने तिच्या बालपणातील आणि आजच्या सण साजरा करण्याच्या खास आठवणी शेअर केल्या आहेत.
“मी फुलबाजीसारखी झळाळणारी आणि शांतही!”
दिवाळीतील फटाके आणि फराळाच्या संदर्भात बोलताना तेजश्री म्हणाली "मला वाटतं मी फुलबाजीसारखी आहे. ती ‘तड तड’ आवाज करत प्रकाश देते, पण त्याच वेळी शांततेची अनुभूतीही देते. ती हळूहळू मंद होत जाते . फराळाच्या पदार्थांबाबत विचारल्यावर तेजश्रीने म्हणते "माझ्या मते, मी चिवड्यासारखी आहे. बाकीच्या फराळाच्या पदार्थांपेक्षा तो थोडा हेल्दी असतो आणि त्यात बऱ्याच गोष्टींचं मिश्रण असतं. त्याप्रमाणे मी ही अनेक विषयांवर बोलते आणि लोकांच्या मनाला आधार देते."
कुटुंबासोबत दिवाळीची परंपरा कायम
दिवाळी साजरी करण्याच्या तिच्या आवडत्या गोष्टींबद्दल बोलताना तेजश्री म्हणते, “मी प्रत्येक वर्षी दिवाळी माझ्या कुटुंबीयांसोबत आणि जवळच्या मित्रांसोबतच साजरी करते. घरभर दिवे लावणं, आकाशकंदिल टांगणं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहणं हेच माझ्यासाठी खऱ्या अर्थाने दिवाळी आहे.” ती पुढे म्हणाली, “दिवाळी म्हणजे केवळ सजावट नाही, तर मनातला प्रकाश जपणंही. सगळ्यांसोबत हसत, बोलत आणि प्रेम वाटत हा सण अधिक सुंदर बनतो.”
‘वीण दोघातली ही तुटेना’ छोट्या पडद्यावर
अलीकडच्या काळात छोट्या पडद्यावर अनेक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात आता अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची नवी मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालत आहे. या मालिकेत तेजश्रीसोबत सुबोध भावे प्रमुख भूमिकेत दिसत असून, त्यांच्या जोडीबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. तेजश्रीने ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सोडल्यानंतर तिचे चाहते काहीसे निराश झाले होते. त्यामुळे तिचा नवीन प्रकल्प कधी येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर चाहत्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देत ‘वीण दोघातली ही तुटेना’चा पहिला भाग 11ऑगस्ट रोजी प्रसारित झाला.
'तू माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट व्यक्ती...'
राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांनी 17 वर्षांच्या सुखीसंसारानंतर आपल्या पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. स्वतः राहुल देशपांडेंनी सोशल मीडियावर पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिलेली. त्यावेळीच त्यांनी स्पष्ट म्हटलेलं, मी पत्नीसोबत घटस्फोट घेतला असला तरीही ती कायमच माझी मैत्रिण राहिल. त्यावेळी राहुल देशपांडेंची एक्स पत्नी नेहा यांनी काहीच भाष्य केले नव्हतं. अशातच आता कित्येक महिन्यांनी राहुल देशपांडेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नेहा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.


















