Tara Sutaria Viral Video: गायिका-अभिनेत्री तारा सुतारिया हिच्या एपी ढिल्लोंसोबतच्या व्हायरल ‘किस’ व्हिडीओवरून सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. परफॉर्मन्स दरम्यान तारा आणि एपी ढिल्लो एकमेकांच्या खूप जवळ आल्याचे फुटेज आणि दुसरीकडे उभा असलेला तिचा बॉयफ्रेंड वीर पहारीयाच्या चेहऱ्यावरची किंचित नाराजी कॅमेऱ्यावर टिपली गेली आणि तारा आणि वीर पहारिया यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या अफवांनाही जोर धरला. ताराला सुतारिया आणि एपी ढिल्लोंचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, अभिनेत्रीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. अखेर तारा सुतारियाने या सर्व चर्चांवर मौन सोडत स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. तिनं हा व्हिडीओ ‘फेक’ आणि ‘चालाकीने एडिट केलेला’ असल्याचं सांगितलं आहे.
‘पीआर कॅम्पेन आम्हाला हलवू शकत नाहीत’
तारा सुतारियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘खोट्या गोष्टी, चलाखीने केलेली एडिटिंग आणि पैसे देऊन चालवलेले पीआर कॅम्पेन आमचं नातं हलवू शकत नाहीत आणि कधीच हलणार नाही. शेवटी प्रेम आणि सत्याचाच विजय होतो. त्यामुळे धमक्यांपेक्षा विनोदच जास्त प्रभावी ठरेल.’
वीर पहारियाचीही प्रतिक्रिया
ताराच्या या पोस्टवर तिचा बॉयफ्रेंड वीर पहारिया यानेही प्रतिक्रिया दिली आहे. कमेंटमध्ये तो म्हणतो, ‘माझ्या रिएक्शनचा व्हिडीओ दुसऱ्याच गाण्यादरम्यान शूट केला होता, तेही “थोडी सी दारू” गाण्याच्या वेळी नाही, हे तरी सांगायलाच हवं. जोकर्स!’या कमेंटमुळेही सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.
तारा सुतारिया- वीर पहारियाचं नातं
तारा सुतारिया आणि वीर पहारियाने याच वर्षी आपलं नातं अधिकृत केलं आहे. दोघंही अनेक इव्हेंट्स आणि पार्टीजमध्ये एकत्र दिसतात. अलीकडेच ‘ट्रॅव्हस अँड लेजर एशिया’ला दिलेल्या मुलाखतीत वीरने तारा सोबतच्या त्यांच्या पहिल्या डेटबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला होता, ‘कदाचित ती आमची पहिली डेट नाईट होती. मी पियानो वाजवत होतो आणि ती सूर्योदयापर्यंत गात राहिली. तेव्हाच मला तिच्या प्रेमात पडलो.’ एपी ढिल्लोंसोबतच्या व्हायरल व्हिडीओमुळे निर्माण झालेल्या अफवांना तारा सुतारियाने ठाम शब्दांत खोडून काढलं असून, आपल्या नात्यात कोणताही दुरावा नसल्याचं स्पष्ट केलं आहे.