Tamil actress Vishnupriya father Death case: मनोरंजनविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे.  प्रसिद्ध आणि लोकप्रिय  तामिळ अभिनेत्री विष्णुप्रिया यांच्या वडिलांचे निधन झाले आहे.  वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक म्हणजे कोडाइकनाल  येथील त्यांच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत एका बंगल्यात आढळला आहे.  पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने तपासाला सुरुवात केली.   पोलिसांना संशय आहे की,  ही हत्या पूर्वनियोजित कट आहे. बदल घेण्याच्या भावनेने त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Continues below advertisement

सूर्यनारायणन असे विष्णुप्रियाच्या वडिलांचे नाव आहे. सूर्यनारायणन यांचा मृतदेह राहत्या घरात खुर्चीवर आढळला. त्यांचे हात बांधलेले होते. तसेच त्यांच्या तोंडावर टेप लावलेली होती.  पोलीस घटनास्थळी येण्यापूर्वीच त्यांचा  मृत्यू झाला होता.  या हत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. कोडाइकनाल येथील  कुरिंजी अंदावर मंदिराजवळ सूर्यनारायणन यांचा बंगला आहे. त्यांचा खूप मोठा बंगला आहे. त्यामुळे  बंगल्यातील काही खोल्या पर्यटकांना भाड्याने देण्यात आल्या होत्या.  

गेल्या दोन दिवसांपासून  खोली भाड्याने घेणाऱ्या पाच तरुणांवर, या हत्येचा संशय असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घरातून सोन्याचे दागिने आणि सीसीटीव्ही हार्ड ड्राइव्ह देखील गायब आहे.  बंगल्यातील दोन कर्मचारी अरुमुगम आणि मुरली हे देखील दोरीने बांधलेले आढळले.  पोलीस सध्या दोघांचीही चौकशी करत आहे. 

Continues below advertisement

पोलीस या प्रकरणाचा संबंध 2018 साली झालेल्या एका हत्येशी  जोडत आहेत. विष्णुप्रियाचा जवळचा मित्र प्रभाकरण  याच्या हत्येप्रकरणी 2018 साली सूर्यनारायणनला अटक करण्यात आली होती.   प्रभाकरणचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत  आढळला. त्याचा मृतदेह एका जंगलात  आढळला होता. यानंतर स्थानिकांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस तपासात सूर्यनारायणनने पाठवलेल्या हल्लेखोरांनीच प्रभाकरणची हत्या केल्याचं उघड झालं. 

मिळालेल्या माहितीनुसार, विष्णुप्रिया आणि प्रभाकरन यांच्यात रिलेशनशिप होते.  यामुळे सूर्यनारायणन नाराज होते.  या प्रकरणात सूर्यनारायणनला काही दिवसांत जामीन मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, सूर्यनारायणनची हत्या का करण्यात आली? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.  या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

हात न लावता महिलेचा काढला टी शर्ट, सर्वांसमोर घातली आंघोळ; एल्विश यादवचा 'तो' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात, टास्कमुळे प्रेक्षक संतप्त