Anandi Ajay Breaks down: तामिळनाडू राज्याचे मु्ख्यमंत्री  विजय थलपती (Vijay Thalapathy) सध्या आपल्या 'जन नायगन' (Jan Nayagan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा त्यांचा शेवटचा सिनेमा असून, या सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली (Anandi Ajay) आहे.  हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.  हा सिनेमा प्रदर्शित  होऊन तीन दिवस पूर्ण झाली आहे. अवघ्या तीन दिवसांत हा सिनेमा 100 कोटींचा आकडा (Entertainment) पार करणार असल्याचं बोललं जात आहे.  दरम्यान, अलिकडेच तामिळ अभिनेत्री  आंनदी अजय हिनं एक इमोशनल व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे.  या व्हिडीओत अभिनेत्री रडत असून, 'जन नायगन' या सिनेमाच्या फायनल कटमध्ये तिचा सीन काढण्यात आल्याचं अभिनेत्रीने सांगितलं.

Continues below advertisement

अभिनेत्री आनंदी अजयने व्हिडीओ शेअर करत चित्रपटातून सीन कापल्याची दिली माहिती (Anandi Ajay emotional video)

'जन नायगन' या सिनेमात झळकण्याची संधी गमावल्याचे दु:ख व्यक्त करताना अभिनेत्री व्हिडीओत म्हणाली की, 'या चित्रपटाच्या प्रदर्शनाची मी वर्षभर वाट पाहत होती'. गुरुवारी अभिनेत्रीने हा व्हिडीओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता.  या व्हिडीओत अभिनेत्री रडत असल्याचं दिसत आहे. ती जवळपास या चित्रपटाची वर्षभर वाट पाहत होती.   तिने व्हिडीओत  'जन नायगन' या सिनेमातून  स्वत:चा सीन कट करण्यावरुन दु:ख व्यक्त केले आहे. 

अभिनेत्री व्हिडीओत म्हणाली, 'विजय थलपती यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या गोष्टीचा मला फार आनंद झाला होता. मी या चित्रपटाबाबत खूप उत्सुक होती. परंतु, या चित्रपटातील माझा सीन फायनल कटमध्ये काढण्यात आला. हे पाहून मला प्रचंड दु:ख झालं. कदाचित पुन्हा मला सुपरस्टारसोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळणार नाही', असं अभिनेत्री रडत म्हणाली. मिळालेल्या माहितीनुसार, 'जन नायगन' हा सिनेमा विजय थलपती यांच्या अॅक्टिंग करिअरच्या कारकिर्दीतील शेवटचा सिनेमा होता. 

सध्या अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. एका युझरने कमेंटमध्ये म्हटलं की, 'तुझ्या भावना मी समजू शकत.  प्लीज हार नको मान.  आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत', असं म्हटलं आहे. तर आणखी एका युझरने कमेंट सेक्शनमध्ये, 'तू खूप टॅलेंटेड  आहेस. प्रत्येक गोष्ट कोणत्या न कोणत्या कारणामुळे होत असते. कोणतीतरी मोठी गोष्ट तुझ्या नशिबात असेल', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.  आनंदी अजय हा तामिळ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'ब्रेस्ट कॅन्सर हा आजार मी लपवून ठेवला, कारण...'; काम गमावण्याच्या भीतीने अभिनेत्रीने लपवून ठेवला गंभीर आजार, आर्थिक संकटही कोसळलं