Taapsee Pannu Kiara Advani Toxic: तापसी पन्नू (Taapsee) सध्या 'गांधारी' (Gandhari) या बहुचर्चित सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातून तापसी पन्नू एक वेगळीच कथा प्रेक्षकांच्या समोर येऊन सादर करणार आहे. यात तिची भूमिका वेगळी आणि दमदार असणार आहे. कधी न पाहिलेल्या भूमिकेत तापसी पन्नू दिसणार असल्यामुळे चाहते या सिनेमासाठी उत्सुक आहेत. तापसी पन्नू सध्या आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी चर्चेत असते. खासदार - अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि तापसी पन्नू यांच्यातील वाद मध्यंतरी चर्चेत आला होता. अलिकडेच अभिनेत्रीने सिनेमातील बदलांविषयी भाष्य केलं आहे. तिच्या मते, 2015 पासून थिएटर रिलीजमध्ये बराच बदल पाहायला मिळत आहे.
तापसी पन्नूचा कियारा अडवाणीला अप्रत्यक्ष टोमणा? (Taapsee Pannu Says She would Rather Retire Than Do Certain)
तापसीचं असं म्हणणं आहे की, जेव्हा सिनेसृष्टीत विविध प्रकारचे, जॉनरचे चित्रपट तयार करण्यात येत होते, तेव्हा सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केल्यामुळे ती स्वत:ला खूप भाग्यवान समजते. अलिकडेच तापसी पन्नूने सुचिन मेहरोत्रा (Suchin Mehrotra) याच्या पॉडकास्टला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने, गेल्या काही महिन्यांत प्रदर्शित झालेले चित्रपट पाहिल्यानंतर तिने आपल्या कुटुंबासोबत सिनेसृष्टीच्या सद्यस्थितीवर चर्चा केली. तिने या मुलाखतीत गंमतीने म्हटलं की, 'मला असं वाटतं की आता रिटायर घेण्याची वेळ आली आहे'.
तापसी पन्नूने मुलाखतीत स्पष्ट केलं की, 'काही विशिष्ट प्रकारचे चित्रपट करण्यापेक्षा रिटायर होणं पसंत करेल', असं तापसी पन्नू मुलाखतीत म्हणाली. तसेच अभिनेत्री हे देखील मान्य करते की, अशा प्रकारच्या सिनेमांचे एक विशिष्ट प्रकारचे प्रेक्षक नक्कीच असू शकतात. तापसी मुलाखतीत म्हणाली की, 'जरी माझं अभिनयावर प्रेम असलं तरी, देखील कोणत्याही प्रोजेक्ट्सवर मी डोळे बंद ठेवून विश्वास ठेवू शकत नाही. जरी काळानुसार, ट्रेंड बदलत राहिले तरी, देखील कलाकाराचे काम कायम लक्षात राहते', असंही तापसी पन्नू म्हणाली. 'आजपासून जरी दशकभरानंतर जेव्हा लोक चित्रपट पाहतील, तेव्हा त्यांना कलाकाराची निवड योग्यच वाटली पाहिजे', असं अभिनेत्री म्हणाली.
दरम्यान, तापसीने आपल्या वक्तव्यात कुणाच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी असा अंदाज बांधला की, तिने अप्रत्यक्षपणे कियारावरच निशाणा साधला आहे. सध्या तापसी पन्नूच्या पॉडकास्टची प्रचंड चर्चा होत आहे. तापसी पन्नूच्या गांधारी सिनेमाबाबत बोलायचं झाल्यास, तिचा आगामी सिनेमा 'गांधारी' नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रिम होणार आहे. हा सिनेमा 3 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तापसी पन्नूसह इश्वाक सिंह, स्वास्तिका मुखर्जी, छाया कदम यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
