Marathi Natak Swapnil Joshi: एखाद्या नाटकात कलाकाराला प्रेक्षकांमुळं होणारा व्यत्यय हा फारसा नवा नाही. प्रेक्षकांचे वाजणारे फोन आणि मोठ्याने बोलत जाणाऱ्या प्रेक्षकांमुळे आजकाल अनेक नाटकांमध्ये आधीच प्रेक्षकांना सूचना देण्यात येतात. कधी कधी अनपेक्षित आवाजामुळे अडथळे येतात आणि नाटक थांबववं लागतं. असाच काहीसा प्रकार स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) यांच्या लग्नपंचमी या नाटकाच्या (Lagna Panchami) प्रयोगादरम्यान घडला. नाटक सुरू असताना बाळाच्या रडण्याच्या आवाजामुळे अभिनेता स्वप्निल जोशीने नाटक काही वेळासाठी थांबवलं. संबंधितांना बाळाला बाहेर घेऊन जाण्याची विनंती केली. हे करताना त्याने ज्या पद्धतीने संवाद साधला त्यांचं कौतूक होतंय. या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Marathi Entertainment)

Continues below advertisement

नेमकं घडलं काय?

स्वप्निल जोशी आणि अमृता खानविलकर यांच्या प्रमुख भूमिका असणार लग्नपंचमी हे  हलक्याफुलक्या विषयावरील नाटक. मधुगंधा कुलकर्णी लिखित, निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित या नाटकाची रंगभूमीवर सध्या प्रचंड चर्चा आहे. उत्तम स्टारकास्ट, दमदार विषय पाहायला मिळत असल्याने या नाटकाला प्रेक्षक गर्दी करत आहेत.नुकत्याच झालेल्या एका प्रयोगादरम्यान कोणाचं तरी बाळ रडू लागलं. एक दोन वेळा दुर्लक्ष केलं मात्र सतत रडणाऱ्या बाळाचा आवाज स्वप्नील जोशीला असह्य झाला, आणि त्याने हलकासा पॉझ घेत संबंधितांना बाळाला बाहेर घेऊन जाण्याची विनंती केली.

तर झालं असं की, नाटकाच्या सीनमध्ये स्वप्निल जोशी यमदूताला म्हणत असतो 'मी मेलो तर माझ्या आई वडिलांचं काय होईल? ' यावर अमृता म्हणते 'सात्विक तुला आई-वडिलांचा पडलंय, बायकोचं काहीच नाही! अमृताच्या बोलण्यावर स्वप्निल म्हणतो 'तू तरुण आहेस गं, तू करशील मॅनेज..त्याचवेळी प्रेक्षकांमधून बाळाचा रडण्याचा आवाज येऊ लागतो. आवाजाकडे फारसं लक्ष न देता स्वप्निल नाटक पुढे नेतो. मात्र, बाळाचा आवाज आणखी वाढताना दिसतो. त्यामुळे स्वप्निल 'एक मिनिट, सॉरी सॉरी .. ' म्हणत संबंधित प्रेक्षकांशी संवाद साधतो. 'या बाळाला आपण बाहेर घेऊन जाऊ शकतो का ? त्यावर प्रेक्षकही सॉरी म्हणतात. त्यावर स्वप्निल म्हणतो 'काही हरकत नाही, सगळ्यांचाच रसभंग होतोय. ' तेवढ्यात बाळ पुन्हा रडू लागतो. बाळालाही तो संबोधून 'ओ बाळा ' म्हणत त्यालाही आवडतं नाटक बघायला ' असं मजेशीरपणे म्हणतो. यावर नाट्यगृहात एकच हशा पिकला होता. 

Continues below advertisement

व्हिडिओवर प्रेक्षकांच्या कमेंट्स 

या व्हिडिओवर प्रेक्षक स्वप्निल ने ज्या पद्धतीने संपूर्ण प्रकार हाताळला त्याचे कौतुक करत आहेत. नाटक सुरू असताना आलेला व्यक्ती शांतपणे आणि संयमाने त्याने हाताळला. विशेषतः त्या बाळाच्या आई-वडिलांचा कुठेही अपमान न होता शांतपणे सांगितलं. त्यामुळे लोक कमेंट करत स्वप्निलचा कौतुक करताना दिसतात.अनेकांनी लहान बाळाला घेऊन प्रेक्षक येतात कशाला? असा सवालही केलाय.