Jai Jai Swami Samarth Episode: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) जय जय स्वामी समर्थ (Jai Jai Swami Samarth) मालिकेत गंगा आणि अंबरीश हे जोडपं - गंगेच्या आयुष्यातील कठीण वाटणारं कोडं सोडवायला निघाले आहेत. स्वामी कृपेने अनेक अडथळ्यांना सामोरं जाऊन अक्कलकोटला पोहोचतात. वाटेत त्यांना संकेत म्हणून अजून एक धागा मिळतो. ज्यात तिचा संबंध कोणी गायत्री नावाच्या बाईशी आहे, हे गंगाला कळतं. पण ही गायत्री कोण? कुठे राहते? तिच्यापर्यंत कसं पोहोचायचं? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ते एका रहस्यमय पडीक घरासमोर येऊन पोहोचतात.
मनातील घालमेल आणि भीतीला बाजूला सारून, स्वामींचं नाव घेऊन गंगा आणि अंबरीश त्या घराचं दार उघडतात आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं सत्य समोर येतं. घरात दिसणाऱ्या आगीच्या खुणा, विचित्र अनुभूती आणि स्वप्नांमधील दृश्यांमुळे गंगा हादरून जाते. त्याचवेळी स्वामी अर्थपूर्ण संकेत देतात, की आता कोडं सुटायची वेळ आली आहे. तसेच गोवर्धनने भूतकाळात केलेली पापं फेडायची वेळ आली आहे. स्वामी गंगासमोर एक धक्कादायक सत्य उलगडतात. गंगा आणि गायत्री यांचा नक्की काय संबंध आहे? गोवर्धनला गंगेचा काटा का काढायचा होता? गंगा आणि गोवर्धन हे कसे कनेक्टेड आहेत? भूतकाळात नक्की कोणतं सत्य दडलंय? यांची उत्तरं मिळविण्यासाठी गंगा तत्पर आहे.
'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा ट्विस्ट (Jai Jai Swami Samarth upcoming episode twist)
दुसरीकडे, स्वामींच्या स्थानावर गोवर्धन हा मार्तंडच्या बोलण्यात येऊन स्वामींचा जीव घेण्याच्या हेतूने येतो. ढोंग करून आपल्या पापांपासून सुटका मिळवण्यासाठी प्रायश्चित्ताचा मार्ग शोधत आलोय असं सांगून तो स्वामींसाठी लाडू घेऊन येतो, ज्यात विष मिसळलेलं असतं. दरम्यान, स्वामी त्याला स्वतःचा गुन्हा कबूल करण्याची संधी देतात, काही कन्फेस करायचं असेल तर शेवटची संधी देतो हेही सांगतात. पण गोवर्धनलाच नियतीचा फटका बसतो. भीतीने व्याकूळ झालेल्या गोवर्धनाकडे पाहत स्वामी अर्थपूर्ण शब्दांत सांगतात, “कोडं सुटायची वेळ झालीये... केलेली कर्म फिटायची वेळ झाली.” आपल्या पापांची फळं आता स्वतःलाच भोगावी लागणार असल्याची जाणीव होताच गोवर्धन पुरता हादरून जातो.
गोवर्धन, गायत्री आणि गंगा यांचा नक्की काय संबंध? भूतकाळात असं काय घडलं की गोवर्धनसमोर आज त्याचा भूतकाळ येऊन उभा ठाकलाय? गंगा गायत्रीपर्यंत पोहोचू शकेल का? गोवर्धनसमोर गायत्री आल्यावर काय होणार? कोणतं धक्कादायक सत्य समोर येणार? गोवर्धन स्वतःच्या तोंडून आपला गुन्हा कबूल करणार का? आणि स्वामींच्या कृपेने सत्याचा विजय आणि पापांचा नाश होणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
जय जय स्वामी समर्थ दररोज रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
शब्द, आठवणी आणि मैत्रीचा शंभरावा सोहळा; ‘पत्रापत्री’च्या साभिनय अभिवाचनाचा शतकमहोत्सवी प्रयोग
