Sushant Singh Rajput Death Case: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता (Bollywood Actor) सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणी सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट (CBI Files Closure Report) सादर केला आहे. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये सुशांतची कथित प्रेयसी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला निर्दोष मुक्त करण्यात आलंय. सीबीआयनं आपल् क्लोजर रिपोर्टमध्ये स्पष्ट केलंय की, रिया चक्रवर्तीनं सुशांत सिंह राजपूतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं किंवा प्रवृत्त केलंय, हे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे त्यांना मिळालेले नाहीत. यासोबतच अनेक गोष्टींचा खुलासा क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. 

Continues below advertisement


CBI च्या क्लोजर रिपोर्टमध्ये काय खुलासे? 


रिया चक्रवर्तीनं सहा दिवसांपूर्वीच सुशांत राहत असलेला फ्लॅट सोडलेला


CBI च्या क्लोजर रिपोर्टनुसार, सुशांतचा 14 जून 2020 रोजी मृत्यू झाला. त्याआधी, 8 जून रोजी, रिया आणि तिचा भाऊ शोविक सुशांतच्या वांद्रे येथील अपार्टमेंटमधून निघून गेले होते. त्यानंतर, त्यांचं सुशांत राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये येणं झालं नाही.  10 जून रोजी सुशांत आणि रियाचा भाऊ शोविक यांचं व्हॉट्सअॅपवर बोलणं झालेलं.  याशिवाय, त्याच्या मृत्यूपूर्वी त्याचा रिया किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी संपर्क नव्हता.


रियानं सुशांतची कोणतीही वस्तू घेतली नव्हती


सुशांतच्या कुटुंबानं रियावर फसवणूक आणि पैसे चोरीचा आरोप केला होता, परंतु 8 जून रोजी जेव्हा ती सुशांतच्या अपार्टमेंटमधून निघून गेली तेव्हा रियानं घरातील कोणतंही सामान सोबत घेतलेलं नव्हतं. तिनं स्वतःसोबत फक्त सुशांतनं भेट दिलेलं एक अॅपल वॉच आणि लॅपटॉप सोबत घेतलेला.


CBI च्या क्लोजर रिपोर्टनुसार, रिया आणि सुशांत एप्रिल 2019 पासून जून 2020 पर्यंत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. या दरम्यान, सुशांतनं रिया चक्रवर्तीवर जे पैसे खर्च केले, ते IPC अॅक्ट 420 अंतर्गत येत नाहीत. कारण सुशांत रियाला आपल्या कुटुंबाचाच एक भाग मानायचा, त्यामुळे सुशांतच्या कुटुंबाकडून सातत्यानं केले जाणारे हे आरोप चुकीचे आहेत. 


रिया चक्रवर्तीला CBI कडून क्लिनचिट


सीबीआयनं सुशांतच्या कुटुंबानं केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, रिया आणि तिच्या भावाला क्लीन चिट दिली आहे. त्यांनी असंही म्हटलंय की, त्यांना असा कोणताही डिजिटल डेटा मिळालेला नाही, जो रियानं सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं हे सिद्ध करू शकेल.


दरम्यान, 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या घरात छताच्या पंख्याला लटकलेला आढळला. त्यानंतर, अभिनेत्याच्या कुटुंबानं रियावर आरोप केला आणि तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर, पोलिसांनी रियाला अटक केली आणि तिला सुमारे एक महिना तुरुंगवास भोगावा लागला.