Suraj Chavan viral video: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss) पाचव्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाणचा (Suraj Chavan) चाहतावर्ग खूप मोठा आहे.  त्यानं टिक टॉकचे व्हिडीओ तयार करुन प्रसिद्धी मिळवली. त्यानं सिनेमातूनही (Entertainment) स्वत:ची ओळख निर्माण केली. सूरज चव्हाणनं 29 नोव्हेंबर 2025 रोजी विवाह केला. दोघांचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. सूरज चव्हाणच्या लग्नाला अवघे 6 महिने पूर्ण झाले आहेत. लग्नाच्या 6 महिन्यांनंतर संजनाच्या प्रेग्नेंसीची चर्चा होऊ लागली. सूरज लवकर बाबा होणार, अशी चर्चा रंगू लागली.  दरम्यान, सोशल मीडियात दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओत संजानाचा बेबी बंप दिसत आहे. त्यामुळे संजना प्रेग्नेंट आहे का? याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. 

Continues below advertisement

संजनाच्या गरोदरपणाची सोशल मीडियावर चर्चा (Is Suraj Chavan wife Sanjana pregnant)

जान्हवी किल्लेकर जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी गेली होती.  जेजुरीवरुन जान्हवी  सूरजच्या घरी गेली होती.  सूरज  चव्हाणच्या घरी गेल्यानंतर जान्हवीनं आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये जान्हवी आधी सूरजची भेट घेते. नंतर घरात जाऊन संजनाची भेट घेते.  तसेच सूरज चव्हाणच्या गावातील मंदिरात जाऊन देवी आईचंही दर्शन घेते. 

जान्हवी कपूरने शेअर केलेल्या व्हिडीओत संजनाचा बेबी बंप देखील पाहायला मिळत आहे.  संजना मंदिराची घंटी वाजवत असताना, तिचा बेबी बंप पाहायला मिळत आहे.  दरम्यान, व्हिडीओत देवीचं दर्शन घेतल्यानंतर जान्हवी संजानाला आधार देत असल्याचं दिसून येत आहे. यामुळे संजना गरोदर आहे की काय?  असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.   

Continues below advertisement

 

जान्हवीनं व्हिडीओ शेअर करत, 'कुणी असो किंवा नसो.. मी कायम तुझ्यासोबत असेन... तुला कायम जपणार आहे', असं  तिनं भावनिक कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी संजनाकडे गुडन्यूज आहे वाटतं, असं म्हणत तिच्या प्रेग्नेंसीचा अंदाज बांधला आहे.   'अरे वाह, लवकरच गोड बातमी मिळणार आहे', असं एकाने कमेंट केली आहे. तर, आणखी एका युझरने, 'संजना गरोदर आहे मग खाली का वाकतेय?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, व्हायरल व्हिडीओवर सूरज किंवा संजनाने अद्याप कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

छाती अन् कंबरेवरच कॅमेरा, 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन, सीन्सवरुन प्रसिद्ध गायिकाही भडकली