Suraj Chavan Zapuk Zupuk Movie Song Launch: जिओ स्टुडिओज (Jio Studios) प्रस्तूत आणि केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचं शीर्षक गीत रिलीज करण्यात आलं होतं, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता पुन्हा एकदा सिनेप्रेमींना भुरळ घालायला 'झापुक झुपूक' चित्रपटाचं नवं रोमॅन्टिक गाणं 'पोराचा बाजार उठला रं' (Poracha Bajar Uthala Ra) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Continues below advertisement

सूरज चव्हाण, जुई भागवत आणि इंद्रनील कामतवर चित्रीत या गाण्यात या तिघांचा रोमॅन्टिक अंदाज पहायला मिळतोय. गाण्यात प्रेमाचा त्रिकोण आपण पाहू शकतो. अभिनेत्री जुई वर सूरज आणि इंद्रनीलचा जीव जडलाय. जुईची दोघांसोबत अफलातून केमिस्ट्री पहायला मिळते जी खूप सुंदर दिसत आहे. पण विशेष म्हणजे, जुई चा शिफॉन सारी मधला कातील लूक आकर्षणाचा विषय ठरतोय. या गाण्याचे बोल आणि त्याची चाल प्रेक्षकांना खिळवून ठेवतेय. गाण्याचा हुकस्टेप सुद्धा सर्वांना थिरकवणारा आहे. कलाकार आणि संगीत सोबतच या गाण्याचं चित्रीकरण सुद्धा तितकच सुंदर आहे. ह्या गाण्याला करण सावंत ह्यांनी गायलं आहे. तर संगीत आणि बोल कुणाल करण ह्यांचं आहे.

'पोराचा बाजार उठला रं' हे गाणं रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. गाणं पाहून सिनेरसिकांची 'झापुक झुपूक' सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटात एक से बढकर एक इतर उत्कृष्ट कलाकार आहेत जसे हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी जे  मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 

Continues below advertisement

दरम्यान, जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्मात्या बेला केदार शिंदे , केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' सिनेमा 25 एप्रिलपासून प्रदर्शित होणार आहे. 

पाहा व्हिडीओ : 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Netflix Releases In April: नेटफ्लिक्सवर मनोरंजनाची मेजवाणी, रिलीज होताय क्लासी फिल्म्स अन् सीरिज; आताच सेट करा वीकेंडचा प्लान