Suraj Chavan Wife Sanjana Share Good News: 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) सीझन 5 चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार (Social Media Star) सूरज चव्हाण (Suraj Chavan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सूरज चव्हाणबाबतची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात प्रेक्षकांना त्यांच्या फॉलोअर्सना उत्सुकता असते. सूरज चव्हाणनं बिग बॉसची (Bigg Boss Marathi) ट्रॉफी उंचावली, त्यानंतर त्याचं स्वप्न सत्यात उतरलं आणि अजितदादांच्या प्रयत्नानं त्याचं आलिशान टुमदार घर उभं राहिलं. घरानंतर सूरजनं आपल्याच मामाच्या मुलीशी साताजन्माची गाठ बांधली आणि सूरज-संजनानं नव्या घरात आपला राजा-राणीचा सुखाचा संसार थाटला. तर, काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या चार महिन्यांतच सूरज चव्हाण बाबा होणार असून संजना गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. अशातच आता दहाच दिवसांत सूरजच्या बायकोनं आणखी एक गूड न्यूज (Sanjana Share Good News) दिलीय. स्वतः सूरजनंही पोस्ट करत ही गूड न्यूज शेअर केलीय.   

संजनाकडे आणखी एक गूड न्यूज (Suraj Chavan Share Good News)

गुढिपाडव्याच्या शुभमूहुर्तावर गरोदर असल्याचं सोशल मीडियावरुन सांगणाऱ्या संजनानं आता दहाच दिवसांत आणखी एक गूड न्यूज शेअर केलीय. यासंदर्भात तिनं पोस्ट शेअर केलीय. संजनाच्या या पोस्टवर सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. संजनानं केलेली ही पोस्ट सूरजसाठी आहे. संजनानं पोस्टमध्ये सूरज चव्हाणचं अभिनंदन केलंय. तसेच, नवऱ्यावर प्रेमाचा वर्षावही केलाय. 

संजनाची सोशल मीडियावर पोस्ट, काय म्हणाली? (Sanjana Share Social Media Post)

संजना पोस्टमध्ये अभिनंदन डिअर अहो, असं म्हणत तिच्या लाडक्या नवऱ्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. आता हे अभिनंदन नेमकं कशासाठी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. 

सूरज चव्हाण प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आहे आणि त्याचे फॉलोअर्स आता 3 मिलियन्स झालेत. इतक्या फॉलोअर्सचा टप्पा गाठल्यानं संजनानं नवऱ्याचं कौतुक केलंय. सूरज चव्हाणनं बायकोची ही पोस्ट आपल्या स्टोरीवर शेअर करत 'धन्यवाद बायको, लव्ह यू टू...' असं म्हणत तिचे आभार मानले आहेत आणि बायकोवर प्रेमाचा वर्षाव केलाय. 

सूरज चव्हाण बाबा होणार, संजनाच्या पोस्टनं वेधलंय लक्ष 

सुरज चव्हाणची बायको संजनानं गुढीपाडव्याच्या निमित्तानं खास फोटोशूट केलेलं. या फोटोशूटमधील एक फोटो तिनं पोस्ट केलेला. त्यामागे एक ऑडिओ ऐकू येत होता... त्यात "अजून तू माझ्या पोटात आहेस, पण मी तुझ्या प्रत्येक हालचालीला ओळखते. तू हललास की, वाटतं आयुष्य हलकं झालं. आता फक्त तुझी वाट बघतेय. तुझ्या त्या पहिल्या श्वासासाठी, आणि त्या छोट्याशा हसण्यासाठी, माझं संपूर्ण जग तुझ्यात बसलेलं आहे..."

संजनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोवर अभिनंदन अशा कमेंट्स केल्यात. लग्नानंतर तीन महिन्यातच सूरज चव्हाण बाबा होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगलीय. याशिवाय राजश्री मराठीच्या सोशल मीडिया पेजवरूनही या संदर्भात एक पोस्ट शेअर करण्यात आलीय, त्यामुळे चर्चांना आणखी दुजोरा मिळाल्याचे दिसतंय. मात्र, सूरज चव्हाण आणि संजना चव्हाण यांच्याकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आता ही केवळ अफवा आहे की, खरंच सूरज चव्हाणच्या घरी गुड न्यूज आहे, याबाबत अजून दोघांनीही कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Suraj Chavan Wants To Work With Allu Arjun: 'मला अल्लू अर्जुनसोबत काम करायचंय...', सूरज चव्हाणला लागलेत साऊथ इंडस्ट्रीचे वेध, म्हणाला, 'सयाजी शिंदेंचा नंबर मिळाला तर...'