Suraj chavhan wedding: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचं (Suraj Chavhan) दणक्यात लग्न लागलंय.  शनिवारी (29 नोव्हेंबर) पुरंदर तालुक्यातील खळद येथील माऊली गार्डन या मंगल कार्यालयात थाटामाटात सुरज चव्हाण चा विवाह सोहळा पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरजच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्याच्या लग्नापूर्वीच्या प्रत्येक विधीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. त्याच्या हळद, मेहंदीच्या कार्यक्रमासह लग्नाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतायत. याच व्हिडिओमध्ये सध्या बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर हिचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. तिने भर मंडपात माईक हातात घेत पाहुण्यांवर वैतागलेली दिसली. "इथं सगळ्यांची डोकी फिरली आहेत.  प्लिझ शांत रहा. सुरजला आधी बाहेर येऊ द्यात." असं म्हणत जान्हवीने लग्न समारंभाची सूत्र हातात घेतल्याचं दिसलं.

Continues below advertisement

सुरजच्या लग्नसमारंभात नेमकं घडलं काय?

आधी टिक टॉककर आणि नंतर बिग बॉसचा पाचव्या पर्वाचा विजेता ठरलेला सुरज महाराष्ट्रात घराघरात पोहोचला. सुरजचे लग्न ठरल्यापासून ते पुढे सगळ्या विधींची चाहत्यांना उत्सुकता होती. हळद, मेहंदीपासून सगळ्याच कार्यक्रमांना चाहत्यांनी सोशल मीडियावर उचलून धरले. सुरजच्या लग्नाची पत्रिकाही व्हायरल झाली होती. त्यामुळे लग्नस्थळी मोठी गर्दी झाली. या गर्दीमुळे सुरजच्या लग्नसोहळ्यात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळालं. गर्दीचा व्यवस्थापन करण्यासाठी तब्बल 50 हुन अधिक बॉडीगार्ड होते. पण गर्दी अनियंत्रित होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. गोंधळाचे वातावरण निर्माण झाले तेव्हा बिग बॉस फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने भर मंडपात वैतागून थेट माईक हातात घेतला. आणि उपस्थित पाहुण्यांना विनंती वजा दम भरला.

जान्हवी काय म्हणाली?

जान्हवी म्हणाली," अरे आपण सुरजच्या लग्नाला आलोय ना ..त्याचं लग्न तर लागू देत आधी .त्याचं लग्न लागू नये असं वाटतंय का तुम्हाला?तो सूरज आतमध्ये बसलाय. वैतागलाय तो ..कृपया थोडस सहकार्य करा. मी हात जोडून सांगते, प्लीज...ऐका माझं...सगळ्यांचीच डोकी फिरली आहेत.आता सुरजला बाहेर तर येऊ द्या. कोणी काहीही करू नका. त्याच्यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आला आहात असं म्हणत जान्हवीने पाहुण्यांना गोंधळ न करण्याचं आवाहन केलं.

Continues below advertisement

सुरजच्या लग्नात जान्हवी किल्लेकर करवली म्हणून प्रत्येक छोट्या छोट्या विधींमध्ये दिसली. वरातीतही सुरजचा फोरविलर मध्ये त्याच्यासोबत डान्स करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. हळद मेहंदी गावदेव अशा सगळ्या सोहळ्यांमध्ये ती सुरजसोबत होती. लग्नातही तिनं बरीच मदत केली त्यामुळे नेटकरांकडूनही जान्हवीचं कौतुक होतंय.