Sunny Leone daughter Boo Box innovation: अभिनेत्री सनी लिओनी प्रोफोशनल पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिला एकूण 3 अपत्य आहेत. ती 3 मुलांचे पालनपोषण करते. ती बऱ्याचदा आपल्या फॅमिलीचे फोटो सोशल मीडियात शेअर करत असते. ती आपल्या मुलांसोबतही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. दरम्यान, अलिकडेच फराह खान तिच्या स्वयंपाकी दिलीपसोबत सनी लिओनीच्या घरी गेली होती. सनी लिओनीच्या घरी गप्पा गोष्टी सुरु असताना, तिनं आपल्या मुलीविषयी मोठी माहिती शेअर केली. हे ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. अभिनेत्रीनं सांगितलं की, तिची 10 वर्षांची मुलगी आता 999 रुपयांच्या वस्तू विकून पैसे कमवू लागली आहे. सनी लिओनीची मुलगी, पैसे कमावण्यासाठी नेमकं करते काय? असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडला आहे. सनी लिओनीनं मुलाखतीतून याबाबत खुलासा केला आहे.
मुलाखतीत सनी लिओनीनं फराह खानला सांगितले की, 'निशाला माहिती आहे की, तिला दत्तक घेतले आहे. ती खूप गोड मुलगी आहे. ती खूप हुशार आणि टॅलेंटेड मुलगी आहे. ती काही आपल्या हातांनी गोष्टी तयार करते. मी तिनं काही तयार केलेले वस्तू दाखवेन. ते आम्ही पेटेंट केले आहे', असं अभिनेत्री म्हणाली. यानंतर फराह, 'आता मी घरी जाऊन माझ्या मुलांची धुलाई करेन', असं म्हणते. सनी लिओनीनं फराह खानला मुलीनं तयार केलेले वस्तू दाखवले. 'हे एक प्रोटोटाइप आहे. याला बू बॉक्स असं म्हणतात. काही मुलांना धुळीची अॅलर्जी असते. लहान मुलं टिश्यू पेपर घरात कुठेही फेकून देतात. निशाला मी कायम सांगायची की, टिश्यू पेपर कुठेही फेकून द्यायचे नाही, थेट डस्टबिनमध्ये टाकायचं'.
'एके दिवशी मी जेव्हा घरी आले, तेव्हा तिनं एक गोष्ट पाहिली, जे पाहून खूप इंटररेस्टिंग वाटली. तिनं टिश्यू बॉक्सवर एक डिस्पोजेबल कप चिपकवला होता', असं सनी म्हणाली. फराह खान निशाच्या आयडियाने इम्प्रेस झाली. ती म्हणाली, 'निशा खरोखरंच हुशार आहे', तिनं पुढे आशा व्यक्त केली की, तिच्या मुलांनीही काहीतरी नव्या गोष्टीचा शोध लावावा. सनी हसली आणि म्हणाली, 'आता दोन्ही मुलांना निशाची ईर्ष्या वाटते. त्यांना असे वाटते की निशा खूप पैसे कमवेल, आणि त्यांना निशाकडे पैसे मागावे लागतील. ती हा बू बॉक्स 999 रुपयांना विकत आहे', अशी माहिती सनी लिओनीनं दिली.
सनी लिओनीनं 2011 साली डॅनियल वेबरशी लग्न केले होते. या जोडप्याला तीन मुले आहेत. 2017 साली या जोडप्यानं निशाला दत्तक घेतली. तर, 2018 साली सरोगसीद्वारे तिला दोन जुळे मुले झाली.
