Sunny Leone Reaction Donald Trump: भारत (India) आणि अमेरिकेत (America) सध्या सर्व काही ठीक नाही. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर 50 टक्के कर लादल्यानंतर, ट्रम्प यांच्यावर केवळ भारतातच नव्हे तर अमेरिकेतही बरीच टीका होत आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीनं (Bollywood Actress Sunny Leone) ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टेरिफवर प्रतिक्रिया दिली आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सनी लिओनीनं अगदी थेटच स्वतःचं मत मांडलं आहे. ट्रम्प यांचे शब्द समजण्या पलिकडचे आहेत, तर त्यांना सहन करणंही कठीण आहे. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांचे विचार कधी कधी पटतात तर कधी कधी त्यांचं बोलणं पटत नसल्याचं सनी लिओनी म्हणाली.
सनी लिओनी नेमकं काय म्हणाली?
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी म्हणाली की, "हा खरं तर खूपच कठीण प्रश्न आहे. कोव्हिडमध्ये मी कॅलिफोर्नियामध्ये राहत होते. जिथे ट्रम्पविरोधी वातावरण असायचं. तेव्हा आम्ही असं ठरवलं होतं की, जेव्हा मित्रांसोबत गेट टुगेदर होईल, तेव्हा राजकारणाबद्दल बोलायचं नाही... कारण राजकारणाचा विषय निघाल्यावर मित्र मित्र राहत नाहीत... तुम्ही मैत्री गमावता... प्रत्येकाची एक बाजू असते आणि त्यावर प्रत्येकालाच ठाम राहायचं असतं... त्यावर मध्यमार्ग काढायचा नसतो. एकतर लोक त्यांना पसंत करतात किंवा त्याचा तिरस्कार करतात. यामध्ये काहीच नसतं."
"मला असं वाटतं की, ती वेळ पुन्हा आली पाहिजे जेव्हा आपण आपल्या नेत्यांवर पुन्हा प्रेम करू शकू. ट्रम्प यांच्या काही गोष्टी मला आवडतात. पण कधी कधी असं वाटतं की हे देवा आता तुम्ही बस करा... या सगळ्यानं खरंच अर्थव्यवस्थेत बदल होईल का? आणि या सगळ्यासाठी आपल्याला किती किंमत मोजावी लागेल? आणि त्यानंतर काय बदलेल? मला खरंच असं वाटतं की, जे काही चाललंय त्याची गरज नाही. माझी अवस्था त्या लोकांसारखी आहे, ज्यांना वाटतं की, आपण निवडून दिलेल्या नेत्यावर प्रेम केलं पाहिजे...", असं सनी लिओनी म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :