Pahalgam Terror Attack : अभिनेता आणि भाजपचा माजी खासदार सनी देओलला (Sunny deol) सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंगचा सामना करत आहेत. जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर सनी देओल याने निषेध व्यक्त केला. मात्र त्यांच्या प्रतिक्रियेनंतर नेटकऱ्यांनी त्यांना त्यांच्या जुने वक्तव्य आठवून दिले, ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास विरोध न करण्याची भूमिका घेतली होती.

दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना सनी देओल काय म्हणाला? 

यावेळी जगाने फक्त दहशतवाद संपवण्याचा विचार केला पाहिजे. कारण त्याचे बळी फक्त निष्पाप लोक आहेत, मानवांने स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची गरज आहे. या दुःखाच्या वेळी मी पीडित कुटुंबांसोबत उभा आहे.

'जाट' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सनी देओलला फवाद खानच्या पुनरागमनाबद्दल विचारण्यात आले. यावर बोलताना सनी देओल म्हणाला होता की, 'पाहा, मला याच्या राजकीय पैलूत जायचे नाही, कारण तिथूनच गोष्टी गोंधळात पडू लागतात.' आम्ही अभिनेते आहोत, आम्ही जगभरातील प्रेक्षकांसाठी काम करतो. लोक पाहत असोत किंवा नसोत, आम्ही सर्वांसाठी अभिनय करत असतो, कला सादर करत असतो. जग जसे आहे, आपण जागतिक राहिले पाहिजे आणि अधिक देशांचे स्वागत केले पाहिजे. हे असेच घडले पाहिजे.

एका वापरकर्त्याने लिहिले - 'तुम्ही पाकिस्तानी कलाकारांना काम देण्याबद्दल बोलत आहात.' दुसऱ्याने लिहिले - 'जात' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तुम्ही काय म्हणालात - पाकिस्तानी कलाकारांना थांबवू नये, सिनेमा सीमांच्या पलीकडे अस्तित्वात आहे. तुमच्यासारख्या लोकांच्या विचारसरणीमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. चित्रपटात तुम्ही हँडपंप उखडून टाकाल, अशा प्रकारे तुम्ही बंधुता टिकवून ठेवाल. सर्व जबाबदारी सैन्य आणि सरकारची आहे, आणि तुम्ही त्यांच्यासोबत एक चित्रपट बनवाल.

दरम्यान पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेता अक्षय कुमार याने देखील दु:ख व्यक्त केलंय. अक्षय कुमारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की,  "पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकून मला धक्का बसला. निष्पाप लोकांना अशा प्रकारे  मारणे ही निव्वळ क्रूरता आहे. मी त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो." अक्षय कुमारची ही एक्स पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

संजय दत्तने लिहिले, "त्यांनी आमच्या लोकांना क्रूरपणे मारले. हे माफ केले जाऊ शकत नाही. या दहशतवाद्यांनी हे जाणून घ्यावे की आम्ही गप्प बसणार नाही. आम्हाला बदला घ्यावा लागेल, मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, गृहमंत्री अमित शहा जी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी यांना विनंती करतो की त्यांनी त्याला योग्य ती शिक्षा द्यावी.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाच्या शूटिंगवेळी डान्सर कृष्णा नदीत बुडाला; नेमकं काय घडलं?