Sunjay Kapur wife priya sachdev changes name on instagram : अभिनेत्री करिश्मा कपूरचा घटस्फोटीत पती संजय कपूर यांचे 12 जून रोजी निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने सर्वांनाच हादरवून सोडले होते. संजय कपूर यांच्या निधनानंतर एका महिन्याच्या कालावधी उलटल्यानंतर त्यांच्या कुटुंबात संपत्तीवरून वाद सुरु झाला आहे. संजय कपूर यांच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून ही वादावादी सुरू आहे. दरम्यान, संजय कपूर यांची पत्नी प्रिया सचदेव हिने इन्स्टाग्रामवर आपले नाव बदलले आहे. एवढेच नव्हे, तर तिने आपले बायो देखील अपडेट केले आहे.

पूर्वी इन्स्टाग्रामवर प्रिया सचदेव कपूर असे तिचे नाव होते. मात्र, पती संजय कपूर यांच्या निधनानंतर काही आठवड्यांतच तिने ते बदलून प्रिया संजय कपूर असे ठेवले आहे. संजय कपूर यांचे निधन पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने झाले होते. असेही सांगण्यात येते की त्यांनी मधमाशी चुकून गिळली होती.

इन्स्टाग्रामवर प्रिया ने फक्त आपले नावच नाही तर बायो देखील बदलले आहे. तिने आपल्या बायोमध्ये लिहिले आहे –"आई, उद्योजिका, गुंतवणूकदार, सोना कॉमस्टारची नॉन-एग्झिक्युटिव डायरेक्टर, ऑरियस इन्व्हेस्टमेंटची डायरेक्टर, @sunjaykapur च्या व्हिजनला पुढे नेत आहे."

प्रकरण काय आहे?

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, सोना कॉमस्टारच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी संजय कपूर यांच्या आई राणी कपूर यांनी दावा केला आहे की त्या सोना ग्रुपमधील बहुसंख्य शेअर्सच्या मालकीण आहेत आणि त्यामुळे त्याच खऱ्या वारसदार आहेत. त्यांचा आरोप आहे की, काही लोक कुटुंबाची संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी स्पष्ट केले आहे की त्यांनी सोना ग्रुपचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणालाही नियुक्त केलेले नाही. इतकंच नव्हे, तर राणी कपूर यांनी असा दावाही केला आहे की त्यांचे बँक खाते फ्रीज करण्यात आले असून त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

करिश्मा कपूरचाही वाटा?

मिडिया रिपोर्टनुसार, करिश्मा कपूरकडून देखील त्यांच्या संपत्तीतील वाट्याचा दावा करत आहेत. मात्र, त्यांच्या वतीने अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

तेरे नाम सिनेमात भिकाऱ्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री आता कशी दिसते? डोळे दिपवणारी कारकीर्द

Sanjay Dutt Fan Left Her 72 Crore Property For Actor: ऐसी दिवानगी, देखी नही कही... एका चाहतीनं मृत्यूनंतर एक, दोन नव्हे तब्बल 72 कोटींची प्रॉपर्टी संजय दत्तच्या नावे केली