Sunita Ahuja filed case for divorce from govinda : बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने एका ब्लॉगमध्ये त्यांच्या घटस्फोटाबाबत सुरु असलेल्या अफवांबद्दल उघडपणे भाष्य केलं होतं. दरम्यान, आता याबाबत नवी माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, सुनिता आहुजाने बांद्रा फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. सुनीता आहुजाने वैवाहिक आयुष्यात फसवणूक केल्याचा आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केलाय. तसेच तो सध्या वेगळा राहात असल्याने घटस्फोट मागितला आहे. सुनीता आहूजा यांनी हिंदू विवाह अधिनियम 1955 च्या कलम 13 (1) (i), (ia), (ib) अंतर्गत घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कोर्टाने गोविंदाला 25 मे रोजी समन्स पाठवलं होतं आणि जूनपासून दोघंही हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुनावणीदरम्यान सुनीता कोर्टात हजर राहत आहेत, परंतु गोविंदा मात्र अनुपस्थित आहे. यापूर्वी सुनिताने तिच्या लेटेस्ट ब्लॉगमध्ये घटस्फोटाच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली होती.
सुनीता आहूजा मंदिरात जाताना दिसल्या. तेथे पुजाऱ्याशी बोलताना त्यांनी सांगितले की, त्या लहानपणापासून महालक्ष्मी मंदिरात जात आहेत. त्यांनी रडत-रडत पुढे म्हटलं, “मी जेव्हा गोविंदाला भेटले तेव्हा मी आईकडे फक्त एवढंच मागितलं की माझं लग्न त्याच्याशी व्हावं आणि संसार सुखाचा व्हावा. आईने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. मुलं देखील दिली.”
सुनीताने पुढे म्हटलं, “पण प्रत्येक गोष्ट सहज मिळत नाही, चढ-उतार येतातच. पण माझा आईवर विश्वास आहे. माझं घर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आई (देवी) पाहून घेईल.” सुनीताने पुढे सांगितलं की, “एका चांगल्या माणसाला आणि एका चांगल्या बाईला दुःख देणं योग्य नाही. मी आईवर (देवी) इतकं प्रेम करते. जे कोणी परिस्थिती निर्माण करतील किंवा कुटुंब तोडण्याचा प्रयत्न करतील, त्यांना आई माफ करणार नाही.”
गोविंदाचा 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीशी अफेअरची चर्चा
गोविंदा आणि सुनीता आहूजा यांनी सतत होत असलेल्या मतभेदांमुळे आणि वेगवेगळ्या जीवनशैलीमुळे वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. असा दावा फेब्रुवारी महिन्यात अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. गोविंदाची एका 30 वर्षांच्या मराठी अभिनेत्रीशी वाढती जवळीक हे त्यांच्या कथित विभक्त होण्याचं प्रमुख कारण आहे, असंही सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर वकिलांनी सांगितलं की, या गोविंदा आणि सुनीताने सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र आता ते पुन्हा एकत्र येत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या