Sunil Pal Humiliated Old Event: कॉमेडियन सुनील पालचा (Comedian Sunil Pal) एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये मुंबईत (Mumbai Event) आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सन्मान तर केला, पण त्यानंतर काही सेकंदातच त्यांचा अपमान करण्यात आला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओबाबत कोणतीही सविस्तर माहिती मिळाली नाही. पण, असं सांगितलं जातंय की, हा व्हिडीओ जानेवारी महिन्याचा आहे. एक कवी संमेलन आयोजित करण्यात आलेलं. या कार्यक्रमादरम्यान, सुनील पालला (Sunil Pal) मंचावर आमंत्रित करण्यात आलं आणि सन्मानाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यातही आलं. मात्र, आभार व्यक्त करण्यासाठी ते ज्या क्षणी माईकच्या दिशेनं वळले, त्याच वेळी मंचावर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं सातत्यानं त्याला माईकपासून दूर जाण्याचा सल्ला दिला. माईकवर बोलण्यापासून रोखलं आणि वारंवार आपल्या जागेवर परत जाण्यास सांगितलं.
एक काळ असा होता की, टीव्हीवर सुनील पाल आपल्या जबरदस्त कॉमिक टायमिंगमुळे (Comic Timing) प्रेक्षकांना खळखळून हसवायचा. विविध कलाकारांची उत्कृष्ट मिमिक्री करण्यासाठी तो ओळखला जायचा आणि त्याचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी कित्येकजण तासन् तास टीव्हीसमोर बसून राहायचे. मात्र आता तो पूर्वीसारखा चर्चेत दिसत नाही आणि त्याला आधीसारखा मान-सन्मानही मिळत नाही. व्हायरल व्हिडीओत सुनील पालचा सन्मान तर केला, पण त्याच्या दुसऱ्याच क्षणी त्याला डावलण्याचा प्रयत्नही झाला.
अलिकडेच सुनील पालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये त्याला स्टेजवर बोलावून पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येतं. पण जेव्हा तो बोलण्यासाठी माईककडे जातो, तेव्हा त्यांना थांबवून परत बसायला सांगितलं जातं. सुनील पाल यांनी अनेकदा विनंती करूनही त्यांना बोलण्याची संधी दिली जात नाही. हा व्हिडीओ जानेवारी महिन्यातील असल्याचं सांगितलं जातंय.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसतंय? (Sunil Pal Viral Video)
सुनील पालचा एका जाहीर कार्यक्रमात अपमान केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. हा प्रकार एका कवी संमेलनातील असल्याचं दिसतंय. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीनं सुनील पॉलला सत्कार करण्यासाठी स्टेजवर येण्याची विनंती केली. सत्कार झाल्यानंतर सुनील पालला प्रेक्षकांचे आभार मानायचे होते, त्यामुळे तो माईकच्या दिशेनं वळला, पण तिथेच उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं त्याला तसं करण्यापासून रोखलं आणि पुन्हा जागेवर जाऊन बसायला सांगितलं. सुनीलनं वारंवार धन्यवाद म्हणून जागेवर बसतो, असं सांगितलं. पण, मंचावरच्या व्यक्तीनं त्याला माईकपासून रोखलं आणि त्याच्यासोबत हुज्जत घातली.
सुनील पालच्या व्हायरल होणार्या व्हिडीओवर विवध प्रतिक्रिया समोर येत आहेत. व्हिडीओमध्ये उपस्थित असलेले काही लोकही सूत्रसंचालकाला सुनील पालला बोलण्याची संधी द्यावी, असं सांगताना दिसतायत. सोशल मीडियावर अनेकांनी या वागणुकीचा निषेध केला असून, सुनील पाल याच्याशी असं वागणं चुकीचं असल्याचं म्हटलंय. सुनील पाल अनेकदा त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो आणि त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं.
दरम्यान, काही प्रेक्षकांना सुनील पालला 'द कपिल शर्मा शो'मध्ये पाहण्याची इच्छा आहे. मात्र, सुनील पाल स्वतः त्या शोचा भाग होण्यास इच्छुक नाही. त्याच्या मते, कपिल शर्माला जेव्हा खरोखर गरज भासेल, तेव्हाच त्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. तरीही, कपिल शर्मानं त्याला अनेकदा शोमध्ये येण्यासाठी आमंत्रण दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
