Mumbai : अभिनेता सुनील ग्रोव्हरला (Sunil Grover) आज दुपारी 03:15 वाजता मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आठवड्यापूर्वी त्याला हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुनील ग्रोव्हरला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर एबीपी न्यूजशी बोलताना डॉ. संतोष कुमार डोरा म्हणाले, "सुनील ग्रोव्हरला छातीत दुखू लागल्याने आणि हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. येथे अँजिओग्राफी केल्यानंतर असे आढळून आले की, त्यांच्या हृदयात तीन मोठे ब्लॉकेज आहेत. तसेच, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे."
डॉ. डोरा यांनी सांगितले की, ब्लॉकेज आढळल्यानंतर सुनील ग्रोवरवर बायपास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर सुप्रसिद्ध तज्ञ डॉ. रमाकांत पंड्या यांच्या देखरेखीखाली शस्त्रक्रिया करण्यात आली.
कोरोनाची लागणही झाली होती
एशियन हार्ट इन्स्टिट्यूट रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमुख डॉ. विजय डिसिल्वा यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुनील ग्रोव्हर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. अशा परिस्थितीत, दोन्ही प्रकारची औषधे दिली जात आहेत. डॉ.डोरा म्हणाले की, सुनील ग्रोवरचा देखील कौटुंबिक इतिहास आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या हृदयविकाराच्या कारणांमध्ये कौटुंबिक कारणे देखील समाविष्ट आहेत आणि त्याशिवाय तो धूम्रपान देखील करतो. त्यामुळे यापुढे त्यांनी तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे.
खाण्या- पिण्याचे पथ्य पाळावे लागतील :
डॉ. डोरा यांनी सांगितले की, रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सुनीलला खाण्या-पिण्याचे पथ्य पाळावे लागतील. तसेच, व्यायाम करावे लागतील आणि वेळोवेळी त्यांना रुग्णालयात येऊन चेकअप करावे लागेल. पुढे डॉ. डोरा असंही म्हणाले की, सुमारे 15 दिवसांनंतर ते शूटिंग आणि इतर कामे करू शकतील. परंतु, तोपर्यंत त्यांना विश्रांती घ्यावी लागेल आणि प्रकृतीची पूर्ण काळजी घ्यावी लागेल.
महत्वाच्या बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha