एक्स्प्लोर

Sudhir Dalvi Critical Family Appeals For Financial Help: 'शिर्डी के साईं बाबा' फेम अभिनेता मृत्यूच्या उंबरठ्यावर; गंभीर आजाराच्या उपचारासाठी पैसेच नाहीत, मदतीचं आवाहन

Sudhir Dalvi Critical Family Appeals For Financial Help: दिग्गज अभिनेते सुधीर दळवी सध्या इन्फेक्शनच्या समस्येनं त्रस्त आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या उपचारांसाठी कुटुंबीयांनी मदतीचं आवाहन केलंय.

Sudhir Dalvi Critical Family Appeals For Financial Help: 'शिरडी के साईं बाबा' (Shirdi Ke Sai Baba) फेम दिग्गज अभिनेते सुधीर दळवी (Sudhir Dalvi) यांची प्रकृती गंभीर असून त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आलं आहे. सुधीर दळवी सध्या इन्फेक्शनच्या समस्येनं त्रस्त आहेत. त्यांना सेप्सिससारखं जीवघेणं इन्फेक्शन (Sepsis Infection) झालं असून ते सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. अशातच आता सर्वात दुःखद बाब म्हणजे, त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या उपचाराना लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी आवाहन करावं लागतंय. 1977 मध्ये आलेल्या 'शिरडी के साईं बाबा'मध्ये सुधीर दळवी यांनी साई बाबांची भूमिका साकारलेली. त्या काळात त्यांना खूप मोठी प्रसिद्धी मिळालेली. अनेकजण त्यांनाच खरेखुरे साईबाबत समजू लागलेले. सध्या ते 86 वर्षांचे असून त्यांना सेप्टिक इंफेक्शन झालंय. 

सेप्टिक इंफेक्शनशी लढतायत सुधीर दळवी, वाढता खर्च अवाक्याबाहेर 

'टेली चक्कर'नं दिलेल्या माहितीनुसार, सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी सध्या 10 लाख रुपयांहून अधिक खर्च झालाय. त्यांचं कुटुंब आर्थिकरित्या पूर्णपणे कोलमडलंय. त्यांच्या उपचारासाठी अजून 15 लाख रुपयांची गरज आहे. त्यासाठी कुटुंबीयांनी आता फिल्म इंडस्ट्रीसोबत सुधीर दळवींच्या चाहत्यांकडे मदतीचं आवाहन केलंय. 

सुधीर दळवी यांचं करिअर, रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्येही साकारलेली भूमिका 

सुधीर दळवी यांच्या इंडस्ट्रीतल्या करिअर आणि सिनेमांबाबत बोलायचं झालं तर, त्यांनी अनेक फिल्म्स आणि टेलिव्हिजन सीरिअल्समध्ये काम केलंय. कित्येक दशकांपूर्वी त्यांनी एका फिल्ममध्ये शिर्डीच्या साईबाबांची भूमिका साकारलेली. ज्यासाठी त्यांना आजही ओळखलं जातं. सुधीर दळवी यांनी रामानंद सागर यांची सीरिअल 'रामायण'मध्येही काम केलेलं. ते त्यामध्ये ऋषि वशिष्ठच्या रोलमध्ये दिसलेले. सुधीर दळवी 2003 मध्येही पडद्यावर दिसलेले. त्यांनी 'वो हुए ना हमारे', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'जय हनुमान', 'विष्णु पुराण', 'बुनियाद' आणि 'जुनून' सारखे टेलिव्हिजन शो केलेले. 

सुधीर दळवींच्या मदतीला धावली रिद्धिमा कपूर, पण होतेय ट्रोल... का? 

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते ऋषि कपूर यांची लेक रिद्धिमा कपूर साहनी हिनं सुधीर दळवींना मदतीचा हात देऊ केला आहे. पण, तिला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. रिद्धिमा कपूरनं अभिनेत्यासाठी जमा करण्यात येणाऱ्या वैद्यकीय निधीत योगदान दिल्याचं जाहीर केलंय. त्यासंदर्भात तिनं एक कमेंट केलीय. म्हणूनच ती ट्रोल होतेय. इन्स्टाग्रामवरील Viral Bhayani च्या पोस्टवर कमेंट करत रिद्धिमानं आर्थिक मदत पाठवल्याचं म्हटलंय, शिवाय तिनं सुधीर यांना लवकरात लवकर बरं वाटावं याकरता प्रार्थनाही केली आहे. यामुळे ती ट्रोल होतेय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Satish Shah Death:किडनी निकामी नव्हे...सतीश शाहांचं निधन कशामुळे?; ऑनस्क्रीन भूमिका निभावणाऱ्या मुलाने सांगितलं खरं कारण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Australia Social Media Ban : ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधान म्हणाले...
ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधान अल्बनीज म्हणाले...
सांगली : विक्रीला ठेवलेल्या फ्रीजमधील सिलिंडरचा स्फोट अन् क्षणात अवघं कुटुंब उद्ध्वस्त, हसत्या खेळत्या कुटुंबाचा सत्यानाश
सांगली : विक्रीला ठेवलेल्या फ्रीजमधील सिलिंडरचा स्फोट अन् क्षणात अवघं कुटुंब उद्ध्वस्त, हसत्या खेळत्या कुटुंबाचा सत्यानाश
Nashik Crime: 'तुझा गेमच वाजवतो' म्हणणाऱ्याचा नाशिक पोलिसांनी उतरवला 'माज'; गोळीबाराच्या मास्टरमाइंडला सिनेस्टाईल पाठलाग करत ठोकल्या बेड्या
'तुझा गेमच वाजवतो' म्हणणाऱ्याचा नाशिक पोलिसांनी उतरवला 'माज'; गोळीबाराच्या मास्टरमाइंडला सिनेस्टाईल पाठलाग करत ठोकल्या बेड्या
सांगली : अवघ्या सहा दिवसांवर आलेल्या लगीनघाईच्या घरात फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून अंत
सांगली : अवघ्या सहा दिवसांवर आलेल्या लगीनघाईच्या घरात फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून अंत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Congress Protest : मुंबईत युथ काँग्रेस आक्रमक, शिवराज मोरेंसह अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
Congress Protest : फलटण डॉक्टर प्रकरणी काँग्रेसचं आंदोलन, पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात
Congress Protest : फलटण डॉक्टर प्रकरणी काँग्रेस आक्रमक, 'वर्षा'वर मोर्चा
Maharashtra Politics: 'भाजपला हद्दपार करायचं आहे', Nashik मध्ये BJP विरोधात Congress-MNS एकत्र
Maharashtra Politics: मुंबई निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये फूट? स्वबळावर लढण्यावरून मतभेद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Australia Social Media Ban : ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधान म्हणाले...
ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधान अल्बनीज म्हणाले...
सांगली : विक्रीला ठेवलेल्या फ्रीजमधील सिलिंडरचा स्फोट अन् क्षणात अवघं कुटुंब उद्ध्वस्त, हसत्या खेळत्या कुटुंबाचा सत्यानाश
सांगली : विक्रीला ठेवलेल्या फ्रीजमधील सिलिंडरचा स्फोट अन् क्षणात अवघं कुटुंब उद्ध्वस्त, हसत्या खेळत्या कुटुंबाचा सत्यानाश
Nashik Crime: 'तुझा गेमच वाजवतो' म्हणणाऱ्याचा नाशिक पोलिसांनी उतरवला 'माज'; गोळीबाराच्या मास्टरमाइंडला सिनेस्टाईल पाठलाग करत ठोकल्या बेड्या
'तुझा गेमच वाजवतो' म्हणणाऱ्याचा नाशिक पोलिसांनी उतरवला 'माज'; गोळीबाराच्या मास्टरमाइंडला सिनेस्टाईल पाठलाग करत ठोकल्या बेड्या
सांगली : अवघ्या सहा दिवसांवर आलेल्या लगीनघाईच्या घरात फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून अंत
सांगली : अवघ्या सहा दिवसांवर आलेल्या लगीनघाईच्या घरात फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून अंत
महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार, आवर घालण्याची गरज; अनिकेत तटकरेंची जहरी टीका महायुतीत भडका
महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार, आवर घालण्याची गरज; अनिकेत तटकरेंची जहरी टीका महायुतीत भडका
Sangli Bailgada Race Sharyat: बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
बकासूर, मथूर, हरण्या सगळ्यांना मागे टाकलं, वेगाचा बादशाह सर्जाने बैलाने मैदान मारलं, आता फॉर्च्युनरही काळ्या रंगाचीच मागणार
Nashik Politics: इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
इकडे नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, पण मुंबईतील नेत्याने अवघ्या 15 मिनिटातच तोंडघशी पाडलं; नेमकं काय घडलं?
सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये आमदार भावालाच आव्हान, हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार?
सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये आमदार भावालाच आव्हान, हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार?
Embed widget