State Government cultural awards :  2020-21 या वर्षाचे राज्य सरकारचे सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पाहूयात पुरस्कारांची नावं आणि विजेत्यांची यादी


1. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार :
2020-21 या वर्षाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार हा दत्त भगत आणि सतिश आळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. 
पुरस्काराची माहिती: रंगभूमीवरील प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या नावे  रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार या नावाने एका कलाकारास दर वर्षी पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. 
पुरस्काराचे स्वरुप: रुपये पाच लाख रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र 


2. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार :
2020-21 या वर्षाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार हा लता शिलेदार उर्फ दिप्ती भोगले यांना तर 2021-22 वर्षाचा सुधीर ठाकूर यांना जाहीर करण्यात आला आहे. 
पुरस्काराची माहिती:  संगीत रंगभूमीवरील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास संगीत रंगभूमी जीवम गौरव पुरस्कार कै. बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर या नावाने एका कालाकारास दर वर्षी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. 
पुरस्काराचे स्वरुप: रुपये पाच लाख रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र 


3. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार :
2021-22 या वर्षासाठीचा  गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर करण्यात आला आहे. 
पुरस्काराची माहिती: महाराष्ट्रातील गायन/संगीत या कलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करुन त्यांचा गौरव करणे आणि त्याद्वारे कलाक्षेत्राच्या विकासाला उत्तेजन देणे ही या पुरस्काराचा उद्देष आहे.  
पुरस्काराचे स्वरुप:  रुपये पाच लाख रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र


4. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार :
2019-20 वर्षाचा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार हा आतांबर शिरढोणकर तर 2020-21 चा हा पुरस्कार संध्या माने यांना जाहीर करण्यात आला आहे. 


पुरस्काराची माहिती: महाराष्ट्रातील लोकप्रिय तमाशा या लोककलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात येऊन त्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा यथोचित सत्कार करणे हा या पुरस्काराचा उद्देष आहे. 


पुरस्काराचे स्वरुप: रुपये पाच लाख रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ 


5. भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार 


2021-22 या वर्षाचा भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार हा दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांना जाहीर करण्यात आला आहे. 
पुरस्काराची माहिती: शास्त्रीय संगीत क्षेत्रात गयन आणि वादन यामध्ये प्रदीर्घकाळ उल्लेखनिय कार्य केलेल्या कलाकारांना भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.  
पुरस्काराचे स्वरुप: रुपये पाच लाख रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र