Tharla Tar Mag: स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ही मालिका (Serial) साडे तीन वर्षे अविरत सुरू आहे. या मालिकेत आता नवनवीन ट्विस्ट (Entertainment) पाहायला मिळत आहे. सायली आणि अर्जून या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलंय. दरम्यान, सायली आणि अर्जून लवकरच गुडन्यूज देणार आहेत. त्यांच्या आयुष्यात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सुभेदारांच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्यामुळे त्यांच्या घरात सध्या आनंदाचं वातावरण आहे. एकीकडे आनंदाचं वातावरण आहे, तर दुसरीकडे अस्मिता आणि सचिनच्या घटस्फोटाची केस सुरू आहे. यामुळे घरात चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान, या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. तो अभिनेता नेमका कोण आहे? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
'ठरलं तर मग' या मालिकेत आता नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एका नवीन कलाकाराची एन्ट्री होणार आहे. सुप्रीत कदम असं अभिनेत्याचं नाव असून, त्यानं या आधीही अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सावळ्याची जणू सावली या मालिकेत त्यानं महत्त्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे त्याला विशेष ओळख मिळाली. दरम्यान, अलिकडेच त्यानं या मालिकेतून एक्झिट घेतली. आता तो दुसऱ्या मालिकेत नव्या भूमिकेत दिसणार आहे.
'ठरलं तर मग' मालिकेत नव्या कलाकाराची एन्ट्री (Tharla Tar Mag Serial New Actor Entry)
'ठरलं तर मग' या मालिकेत अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सुप्रित कदमने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुप्रित एका कारमध्ये बसलेला दिसत आहे. तो लांबून सायलीचा व्हिडीओ शूट करतो आणि कारची काच बंद करतो. त्यानं सायलीचा लपून व्हिडीओ का काढला? हे मालिकेतून स्पष्ट होईल. या नव्या कलाकाराच्या एन्ट्रीमुळे सायली आणि अर्जूनच्या आयुष्यात कोणतं नवं वादळ येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सुप्रित कदमनं आतापर्यंत अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवली. अभिनेत्यानं आतापर्यंत, 'लग्नाची बेडी', 'नकळत सारे घडले', 'काव्यांजली' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सुप्रित आता लवकरच 'ठरलं तर मग' या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत सुप्रित नेमकं कोणती भूमिका साकारणार? याची माहिती अद्याप समो आलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
नोरा फतेहीचा इंटरनॅशनल जलवा; Siir Siir गाण्यानं धुमाकूळ घातला, 18 तासांत 6.1 मिलियन व्ह्यूज
