Star Pravah Prajakta Gaikwad New Serial Pathrakhin: सध्या टीव्हीवर (Television News) आता अनेक नव्या मालिका येऊ घातल्यात, तर अनेक जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. नव्या मालिकांमध्ये नवे चेहरे दिसताय, तर काही जुने चेहरे पुन्हा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहेत. अशातच आता स्टार प्रवाहवर एक नवी मालिका (New TV Serial) सुरू होते, जिची जोरदार चर्चा रंगली आहे. या मालिकेत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणाऱ्या दोन बहिणींची गोष्ट दाखवण्यात आली आहे. यामध्ये दोन प्रसिद्धी अभिनेत्री (Famous Actress) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघींपैकी एक टेलिव्हिजन विश्वातला प्रसिद्ध चेहरा आहे, जो 5 वर्षांनी टीव्हीवर कमबॅक करतोय. तर, एक प्रसिद्धी अभिनेत्री आहे, जी सिनेमांमधून टेलिव्हिजनवर पदार्पण करतेय.
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर लवकरच 'पाठराखीण' (Pathrakhin New Serial) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही गोष्ट आहे प्रत्येक संकटात आणि प्रत्येक वेदनेत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणाऱ्या भाग्यश्री आणि प्राजक्ता या दोन बहिणींची. बहिणींच्या नात्यातील निस्सीम प्रेम, त्याग आणि जिव्हाळा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सुख-दुःखात नेहमी सोबत असणाऱ्या या बहिणींचं आयुष्य मात्र एका अनपेक्षित वळणावर बदलतं. परिस्थिती, समाज आणि नियती यांच्या कसोटीवर त्यांचं नातं कसं टिकून रहातं, याची उत्कंठावर्धक मांडणी या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तब्बल 5 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तर सिनेमांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडलेली गुणी अभिनेत्री गौरी इंगवले पाठराखीणच्या निमित्तानं मालिका विश्वात दमदार एण्ट्री घेणार आहे.
'पाठराखीण' मालिकेचा प्रोमो पाहिलात?
प्राजक्ता गायकवाड हिच्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. तिच्या मुख्य भूमिकेतील 'पाठराखीण' या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या मालिकेत प्राजक्तासोबत गौरी इंगवले देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ही मालिका 1 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असली, तरी स्टार प्रवाहनं अद्याप कोणत्या वेळेत ही मालिका पाहायला मिळणार, हे जाहीर केलेलं नाही.
'पाठराखीण' मालिकेची निर्मिती बांदेकर कुटुंबियांच्या 'सोहम प्रोडक्शन'कडून केली जात आहे. कलाकारांच्या फळीमध्ये मिताली जगताप या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्या मालिकेत प्राजक्ताच्या मामीची, तर गौरीच्या आईची भूमिका साकारणार आहेत. तर, रमेश वाणी (मामा – चंद्रशेखर वैद्य) हे प्राजक्ताच्या मामांच्या भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी ते ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत झळकले होते. याशिवाय दीप्ती लेले आणि शकुंतला नरे यांचीदेखील झलक या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
