Anandi Ram Navami special promo story: स्टार प्रवाहवरील 'आनंदी' (Anandi) मालिकेला पहिल्या भागापासून प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  30 मार्च 2026 पासून सुरू झालेल्या या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे,  यातून अंध साध्या सरळ मुलीची कथा दाखवण्यात आली आहे.  या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होतेय. मनाला भिडणाऱ्या या मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला  आहे. सोशल मीडियावरही या मालिकेचं विशेष कौतुक केलं जात आहे. दरम्यान, नुकतंच या मालिकेचा दुसरा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. स्टार प्रवाह या वाहिनीच्या सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. पुढच्या भागात नेमकं काय घडेल? याची पुसटशी  कल्पना नक्कीच या प्रोमोमधून स्पष्ट झाली आहे. 

Continues below advertisement

रामनवमी (Ramnavmi) विशेष 'आनंदी' या मालिकेचा विशेष प्रोमो शेअर करण्यात आला आहे. स्टार प्रवाह चॅनेलने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो, प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर (समीर धर्माधिकारी) हे एका कार्यक्रमस्थळी पोहोचतात. राम नवमी विशेष या कार्यक्रमात आनंदी (जाई खांडेकर) (Jaaee Khandekar) युगंधर निंबाळकरांसमोर भारूड सादर करते. यावेळी  युगंधर आनंदीला, 'पोरी.. तुला जर असं वाटत असेल,  भारुड गाऊन तुझ्या आजोबांची गेलेली नोकरी परत मिळू शकते, तर तसं होणार नाही', असं म्हणतात. 

तेव्हा 'आनंदी', 'माझ्यामुळे आबांची नोकरी गेली आहे, आता मलाच मार्ग काढावा लागेल', असं म्हणते.  दरम्यान, आनंदीसमोर, आपल्या आबांची नोकरी परत मिळवण्याचं मोठं आव्हान उभं आहे. दरम्यान, आपल्या आबांची नोकरी परत मिळवण्यासाठी आनंदी नेमकं काय करते? हे लवकरच नव्या एपिसोडमधून समोर येईल.  स्टार प्रवाह वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आनंदी या मालिकेचा रामनवमी विशेष प्रोमो शेअर करण्यात आला आहे.  प्रोमो शेअर करुन चॅनेलने, ' आबांची नोकरी परत मिळवू शकेल का आनंदी?' असं कॅप्शन दिलं आहे. 

Continues below advertisement

 

रामनवमी विशेष एपिसोडमध्ये नेमकं काय घडणार?  आनंदी आबांची नोकरी परत मिळवण्यासाठी नेमकं काय करणार?  हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरेल.  आनंदी ही मालिका आपल्या स्टार प्रवार या वाहिनीवर 9:30 वाजता पाहता येईल.